आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Ability To Cope With Future Problems By Reducing Hermetic Stress Is Possible With The Benefit Of Specific Exercises|Marathi News

कॅलिफो र्नियातील संशोधन:हॉर्मेटिक स्ट्रेस कमी झाल्याने भविष्यातील समस्येशी लढण्याची क्षमता शक्य, विशिष्ट व्यायामाने मिळतो लाभ

सॅकरामँटा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थकवा, अनिद्रा, सांधेदुखीतील वेदना, बेचैनी वाटत असल्यास तुम्हाला हॉर्मेटिक स्ट्रेसचा विकार जडू शकतो. महामारीनंतर गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारची लक्षणे जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येत आहे. कार्यालयात काम करणाऱ्यांमध्येही अशी समस्या जास्त दिसून येत आहे. हॉर्मेटिक स्ट्रेसपासून सुटकेसाठी लाेक थंड पाण्याचा शाॅवर घेतात किंवा साेनाबाथला प्राधान्य देतात. परंतु हे केवळ तात्कालिक उपाय ठरतात. यातून दीर्घकालीन तोडगा निघू शकत नाही.

कॅलिफो र्निया विद्यापीठातील एजिंग मेटाबाॅलिझम अँड इमोशन सेंटरच्या संचालक डाॅ. अलिसा इपेल यांनी हॉर्मेटिक स्ट्रेस विषयात संशोधन केले आहे. अलीकडेच द वाॅल स्ट्रीट जर्नलमध्ये यासंबंधीचा लेख प्रकाशित झाला आहे. त्यानुसार हा एक मर्यादित कालावधीचा शारीरिक थकवा असतो. त्याला लवकरात लवकर बरे केले पाहिजे. परंतु कालावधी उलटून गेल्यानंतर व्याधीतून बरे होणे कठीण होऊन जाते. हॉर्मेटिक स्ट्रेस ही एक प्रकारची प्रतिक्रिया आहे. त्यातून भविष्यातील आव्हानांशी लढण्याची क्षमतादेखील मिळू शकते. जीवनशैलीतील काही बदल स्वीकारून त्यावर नियंत्रण मिळवता येते. श्वासासंबंधी तंत्राद्वारे त्यावर सर्वाधिक लाभ मिळवता येतो. त्यातून काही बायाेलाॅजिक रिस्पाॅन्स समोर येतात. व्यायाम तसेच भाेजनात फायटाेकेमिकल्सचा वापर केल्यास ते लाभदायी ठरते, असे इपेल यांनी सांगितले.

हाय इंटेन्सिटी व्यायामातून कमी वेळेत तणाव घटतो
हाय इंटेन्सिटी स्वरूपाच्या व्यायामातून कमी वेळेत तणाव कमी करता येऊ शकतो. क्राेमिक स्ट्रेस व हार्मेटिक स्ट्रेस यात फरक आहे. यातून कर्टिसोल या हार्मोनची पातळी राखण्यासाठी करा किंवा मरा अशी स्थिती निर्माण होते. यातून आरोग्यावर परिणाम होतो आणि लढण्याची क्षमताही वाढते.

बातम्या आणखी आहेत...