आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॅनडातील ओंटारियो येथील एका मंदिरात पुन्हा एकदा तोडफोड व मंदिराच्या भीतींवर भारतविरोधी घोषणा लिहण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, मंदिराची तोडफोड व नुकसान करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. विंडसर, ओंटारियो येथील BAPS श्री स्वामीनारायण मंदिरात बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
पोलिसांना या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे. यामध्ये दोन आरोपी मंदिराच्या भिंतीवर घोषणा लिहिताना दिसत आहेत. विंडसर पोलिस सेवेने दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर सीसीटीव्ही फुटेज जारी करून आरोपीला वाँटेड घोषित केले आहे. गेल्या वर्षी जुलैपासून कॅनडात घडलेली ही पाचवी घटना आहे.
मंदिर व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना केले सतर्क
मंदिरात काम करणारे हर्षल पटेल म्हणाले की, मंदिराच्या भितींवर स्लोगन लिहिलेले पाहून आम्हाला धक्का बसला. 20 वर्षात प्रथमच येथे असे घडले आहे. याबाबत आम्ही तातडीने स्थानिक पोलिसांना माहिती दिली. मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी या घटनेनंतर शहरातील हिंदू समाज संतप्त झाला आहे.
महात्मा गांधींच्या पुतळ्याची झाली होती तोडफोड
यापूर्वी 27 मार्च रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सायमन फ्रेझर विद्यापीठात महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. दुसरीकडे, 23 मार्च रोजी ओंटारियो प्रांतातील हॅमिल्टन शहरातील सिटी हॉलमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आली होती. खलिस्तान समर्थकांनी त्यावर स्प्रे पेंटने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा लिहिल्या होत्या. वृत्तानुसार, खलिस्तानवाद्यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर अनेक अपमानास्पद गोष्टीही लिहिल्या होत्या.
कॅनडातील मंदिरांमध्ये तोडफोडीच्या घटना
कॅनडातील खलिस्तानींमुळे भारतीय राजदूताचा प्लॅन रद्द
महात्मा गांधींचा पुतळा तोडण्याच्या घटनेपूर्वी कॅनडा सरकारने खलिस्तानींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. खरं तर, कॅनडाच्या ओटावा शहरात खलिस्तानींनी निदर्शने केली होती. यामध्ये आंदोलकांनी एका भारतीय पत्रकारासोबतही अश्लील कृत्य केले होते.
खलिस्तानींनी केलेल्या विरोधामुळे भारतीय राजदूताला ब्रिटिश कोलंबिया, कॅनडातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची योजना रद्द करावी लागली. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून खलिस्तानींच्या उपद्रवाविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
लंडन आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये खलिस्तानींनी भारतविरोधी केली निदर्शने
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात रविवारी तिरंग्याचा अपमान झाल्यानंतर खलिस्तान समर्थकांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावरही हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार- रविवारी येथे खलिस्तान समर्थकही जमले होते. या लोकांनी स्प्रे पेंट्सने अमृतपाल रिहा करो… लिहिले. या लोकांनी वाणिज्य दूतावासाचे दरवाजे तोडले. तिथे खलिस्तानचे झेंडे फडकवले गेले.
लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी अटक
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर तिरंग्याचा अपमान करणारा खलिस्तानी समर्थक अवतार सिंग खांडा याला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. खांदा हा प्रतिबंधित गट बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चा सदस्य आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये सुरू असलेल्या तपासात खांडा हा अमृतपालचा हस्तक असल्याचेही समोर येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.