आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Adventures Of George Of Canada; Photographs Taken Directly Near The Mouth Of The Fiery Maram Volcano

साहस:कॅनडाच्या जॉर्ज यांचे साहसवेड; धगधगत्या मॅरम ज्वालामुखीच्या थेट मुखाजवळ टिपली छायाचित्रे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रख्यात अॅडव्हेंचररने शेअर केले सर्वोत्तम छायाचित्र

धगधगत्या ज्वालामुखीच्या मुखाजवळ उभ्या असलेल्या या व्यक्तीचे नाव आहे जॉर्ज कोरोओनिस. या कॅनेडियन व्यक्तीला अत्यंत उग्र हवामान, वादळे, ज्वालामुखींजवळ जाऊन तेथील फोटोग्राफी करण्याचा साहसी छंद आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वाेत्तम व सर्वात धोकादायक छायाचित्र ब्रिटनची वेबसाइट मेलऑनलाइनसोबत शेअर केले. जॉर्ज म्हणाले, केनियातील गुहेत फोटो काढत असताना त्यांना विषारी वटवाघळाने दंश केला होता. तीव्र वेदनांमुळे त्यांचे प्राण कंठाशी आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही जॉर्ज यांच्या नावाची नाेंद आहे. ज्वालामुखीच्या आत जाऊन मातीचे नमुने घेणाऱ्या नॅशनल जिओग्राफिकच्या चमूतही त्यांचा सहभाग होता. हे छायाचित्र वानुआतू बेटसमूहातील ज्वालामुखी बेट अॅम्ब्रिमच्या मॅरम ज्वालामुखीचे आहे.