आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Adventures Of Japanese Businessman Maezawa Returned From The International Space Station | Marathi News |

​​​​​​​ टोकियो:अंतराळात जातो तेव्हा पृथ्वीविषयी आवड निर्माण होते, येथे हवा आहे, गंध आहे आणि हवामानही, मी याकरिता पृथ्वीचे आभार मानतो : मेजावा

​​​​​​​ टोकियोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून परतलेल्या जपानी उद्योजकाने शेअर केला प्रवासाचा रोमांच

‘अंतराळातील प्रवासाने मला पृथ्वीविषयी आणखी आवड निर्माण केली आहे,’ हे मत जपानी उद्योजक युसाकू मेजावा यांचे. ते नुकतेच इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर १२ दिवस घालवून परतले आहेत. त्यांना पुढील वर्षी चंद्रावर जायचे असून त्यांनी मस्क यांची कंपनी स्पेसएक्ससोबत करार केला. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी प्रवासाचा अनुभव शेअर केला. वाचा त्यांच्याच शब्दांत...

अंतराळातून पृथ्वी बघणे आनंददायी, चित्रांपेक्षा १०० पटींनी सुंदर दिसते दृश्य; तेथे झोपेसाठी मात्र मोठा संघर्ष
जेव्हा तुम्ही अंतराळात पोहोचता तेव्हा पृथ्वीचे महत्त्व अधोरेखित होते. या प्रवासाने मला पृथ्वीविषयी कृतज्ञ बनवले. तेथे हवा आहे, वास आहे आणि अनेक ऋतूही आहेत, याबाबत आभार मानावे लागतील. तेथील शून्य गुरुत्वाकर्षणात चहा बनवणे, स्वच्छ कपडे परिधान करण्याची उणीव अशी आव्हाने तर होती, पण मला कधीच भीती वाटली नाही. लाँचिंगचा अनुभव खूपच चांगला होता. असे वाटले स्टेशनवरून शिंकासेन (जपानी बुलेट ट्रेन) सुटलीय. हे सर्व इतक्या शांततेत झाले की त्याची जाणीवच झाली नाही.

जेव्हा मी खिडकीतून पाहिले तेव्हा अंतराळातून पृथ्वीचे सौंदर्य बघणे चित्रांच्या तुलनेत १०० पटींनी सुंदर होते. तुम्ही अंतराळात जगातील नेत्यांसोबत राहण्याविषयी विचार करू शकता. अर्थातच मी असे करण्यासाठी इतका शक्तिशाली व्यक्ती नाही. पण तसे शक्य झाले तर विश्व राहण्यासाठी एक चांगली जागा ठरेल. मला वाटते की अंतराळाशी संबंधित व्यवसायात मोठ्या शक्यता आहेत. तथापि, अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणातील जीवनातून सामान्य जीवनात परतणे अपेक्षेपेक्षाही कठीण सिद्ध झाले. आधी मी यातून बाहेर पडू इच्छितो. स्पेसमध्ये झोपणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुमच्या शरीराला धरून ठेवण्यासाठी काहीच नाही. मनात आणखी एक इच्छा डोकावत आहे, ती म्हणजे पुढील वर्षी मी चंद्रावर जाऊ इच्छितो. त्यासाठी स्पेसएक्स मिशनमध्ये सहभागी झालो. चंद्रासारख्या उंचीसह खोलात जाण्याचेही माझे स्वप्न आहे. मी समुद्राखाली मारियाना ट्रेचला जाण्याची योजना आखत आहे. हे सर्वात खोल ठिकाण आहे. तेथे कोणीही गेलेला नसेल. मला नेहमीच आव्हानांचा सामना करायचा आहे. असे करताना मला आनंद मिळतो.

मेजावा जपानी अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती १४ हजार कोटी रुपये आहे. या प्रवासासाठी झालेला ३७२ कोटी रुपयांचा खर्चही त्यांनीच उचलला.

बातम्या आणखी आहेत...