आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानातून अमेरिकी लष्कर परतल्याने तालिबानला नवी उभारी मिळाली आहे. तालिबानने कोणतेही युद्ध न करता अर्ध्यापेक्षा जास्त देशावर नियंत्रण मिळवले आहे. यात सात महत्त्वाचे सीमाबिंदू आणि क्रॉसिंगचा समावेश आहे, जेथे शेजारी देशांसोबत दररोज हजारो डॉलरचा व्यापार होत असतो. यामुळे सीमेपलीकडून होणाऱ्या व्यवसायातून होणारा सर्व महसूल तालिबान वसूल करत आहे. सध्या तालिबानच्या नियंत्रणात सीमेपलीकडून स्पिन बोल्डक, इस्लाम किला, तोर गोंडी, शेर खान बंदर आणि ऐ खानमसारखी महत्त्वाची शहरे आहेत. ही शहरे पाकिस्तान, इराण, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि चीन सीमेवर आहेत. दरम्यान, उत्तर अफगाणिस्तानात तालिबान आणि अफगाण दलांमध्ये भीषण युद्ध सुरू आहे.
इराण आणि तुर्कमेनिस्तान सीमेलगतच्या हेरात प्रांतातील गिजरा आणि कुरुख जिल्ह्यावर नियंत्रण मिळवले आहे, तेथे तालिबान्यांशी लढणारे सरदार इस्माईल खान यांच्या प्रमुख कमांडरचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अफगाणिस्तान सरकारने तालिबानशी लढण्यासाठी स्थानिक टोळ्यांना एकत्र करणे सुरू केले आहे. त्यांना मिलिशिया किंवा बंडखोर म्हणून ओळखले जाते. अफगाणिस्तानच्या उत्तर, उत्तरपूर्व, मध्य आणि पश्चिम भागात एकत्र केले जात आहे. त्यात कुंदुज, बदख्खां, तखर, हेरात, निमरोज, फराह, बामियान, बडघिस, तखर, मजार-ए-शरीफ आणि घोर प्रांताचा समावेश आहे. या प्रांतात या बंडखोरांना सरकार शस्त्र, इतर सैन्य उपकरणे व पैसे उपलब्ध करून देत आहे. एका स्थानिक मिलिशिया कमांडरने सांगितले की, तालिबानी अत्याचार करतात आम्ही त्यांना तसे करू देणार नाहीत.
मिलिशिया दलांना सशक्त करणे अंधार युगात परत जाण्यासारखे : तज्ज्ञ
काबूलचे संशोधक तमीम हसरत सांगतात, मिलिशिया दलांचा वापर अंधारयुगात परत जाण्यासारखे आहे. त्यांना सशक्त केल्याने भूतकाळासारखा धार्मिक संघर्ष वाढेल आणि समाजावर नकारात्मक प्रभाव पडेल. ते सांगतात, ही एक अशी गोळी आहे जी गनी सरकारला तात्पुरते वाचवेल, मात्र भविष्यात ती त्यांच्यासाठी विषारी सिद्ध होईल. अफगाण पोलिस, लष्कर व विशेष दलांची संख्या जवळपास ३ लाख आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.