आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनच्या संसदेने फेब्रुवारीत विवाहाचे वय दोन वर्षांनी वाढवून १८ वर्षे केले. आतापर्यंत आई-वडिलांच्या परवानगीने साेळाव्या वर्षी विवाह आटाेपले जात. वयाेमर्यादा वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. हे लक्षात घेऊन ब्रिटनच्या संसदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
संसदेने घेतलेला हा निर्णय म्हणजे अतिशय चांगली सुरुवात मानली जात आहे. विराेधी पक्षाने मात्र या निर्णयाला विराेध केला आहे. हा अनावश्यक निर्णय असल्याचे विराेधी गटाचे म्हणणे आहे. मुले-मुली साेळाव्या वर्षी शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकत असल्यास त्यांना विवाह करण्यासाठी बंधन का, असा प्रश्न विराेधी गटाने उपस्थित केला आहे. बालविवाह राेखण्यासाठी माेहीम चालवणारे जसविंदर सांघेरा म्हणाले, साेळाव्या वर्षी मद्यपान करता येत नाही, जुगार खेळता येत नाही, परंतु विवाह मात्र करता येऊ शकतो. हा नियम चुकीचा होता. साेळाव्या वर्षी विवाहाचे अनेक वाईट परिणाम दिसून आलेले आहेत. उदाहरणार्थ-कमी वयात विवाह झाल्यावर मुली अनेकदा उच्च शिक्षणापासून वंचित होतात. या मुद्द्यावर विवाह कॅपनेस व शँपन नावाचे अभियान चालवणाऱ्या लाेकांच्या म्हणण्यानुसार कवी, गायकांनी आधुनिक युगात प्रेम करण्याच्या धारणेला तोडमाेड करून सादर केले आहे. म्हणूनच साेळाव्या वर्षी विवाहाचे हा गट समर्थन करतो. जुन्या काळात सत्ता व संपत्तीसाठी विवाह केला जात असे. माँटेग्यूज व कॅपुलेट्सने हे समजून घेतले.
महिलांना पसंतीचा जोडीदार िनवडीचा अधिकार
आॅस्टेन्स अलिजा बेनेट म्हणाले, साेळाव्या वर्षी िववाहाला बंदी घालणाऱ्या कायद्यामुळे महिलांना पसंतीचा जोडीदार निवडीचा अधिकार मिळण्याचा मार्ग माेकळा होईल. त्याचबराेबर विवाहापूर्वी उच्च शिक्षण घेऊन त्याविषयी महिला चांगल्या प्रकारे जागरूक होऊ शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.