आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Army Stormed The House In Search Of Protesters, Slapping A Seven year old Girl In Her Father's Arms News And Updates

म्यानमारमध्ये सैन्याचे क्रौर्य:निदर्शकांच्या शोधात सैन्य घरात घुसले, वडिलांच्या कुशीतील सातवर्षीय मुलीवर झाडली गाेळी

यांगून6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत अशा कारवायांत २० मुलांचा मृत्यू झाला

म्यानमारमध्ये तख्तपालटाच्या विराेधात आंदाेलनावर दडपशाही करणारे सैन्य गाेळीबारही करत आहे. एका घटनेत सैनिकांनी मैना थाजी गावात केलेल्या गाेळीबारात सातवर्षीय मुलीला गाेळी लागली. गाेळी लागली तेव्हा ती वडिलांच्या कुशीत हाेती. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या आंदाेलनाबाबत निर्दयी कारवायांतील ही सर्वात कमी वयाची पीडित ठरली. मृत मुलीचे नाव खिन मायाे चित आहे. घटनेनंतर शेजारी सुमाया म्हणाले, आंदाेलनात सहभागी लाेकांचा आणि त्यांच्याजवळील शस्त्रांचा शाेध घेण्यासाठी पाेलिस घरांची झडती घेत आहेत.

या कारवाईत पाेलिस खिनच्या घरी पाेहाेचले. त्यांनी लाथ मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. खिनच्या माेठ्या बहिणीने दरवाजा उघडला. घरात आई-वडील आहेत का, अशी विचारणा केली. खिनच्या बहिणीने “नाही’ असे सांगितले. पाेलिसांनी तिला खाेटारडी म्हणत मारहाण केली. घराच्या आत शाेध घेतला. पाेलिसांचे वर्तन पाहून मुलगी घाबरली आणि ती वडिलांना बिलगत कुशीत गेली. त्यात पाेलिसांनी वडिलांना गाेळ्या मारण्यास सुरुवात केली. चुकून मुलीलाही गाेळी लागली. ती जागीच गतप्राण झाली. या प्रकरणात लष्कराने काही बाेलण्यास नकार दिला. मानवी हक्क संघटना ‘सेव्ह द चिल्ड्रन’च्या म्हणण्यानुसार मुलीच्या मृत्यूमुळे लाेकांत घबराट पसरली आहे. सैन्य लहान मुलांनाही लक्ष्य करत आहे. आतापर्यंत अशा कारवायांत २० मुलांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...