आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Attempt To Raise The Kashmir Issue On The Basis Of A Friend Failed; Pakistani Ministers Warn Saudi, Call OIC Meeting

चालबाजी:मित्राच्या आधारे काश्मीर मुद्दा मांडण्याचा डाव अयशस्वी; पाक मंत्र्यांचा सौदीला इशारा, ओआयसीची बैठक बोलवा

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीर मुद्द्यावर समर्थन करणाऱ्या देशांसोबत चर्चा करा : कुरेशी

चीन व तुर्कीच्या तालावर नाचणाऱ्या पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरून आपला जुना मित्र सौदी अरेबियाला इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांना पाठिंबा मिळत नसल्याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सौदीच्या नेतृत्वाखालील ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-अॉपरेशनला (आेआयसी) धमकावण्यास सुरुवात केली आहे. आेआयसीने काश्मीरप्रश्नी परराष्ट्रमंत्रीस्तरीय परिषदेची बैठक बोलवावी. त्यात कोणत्याही परिस्थितीत टाळाटाळ करता कामा नये. पाकिस्तानच्या एआरवाय या वृत्तवाहिनीशी कुरेशी बोलत होते. आेआयसीविषयी मला सन्मान आहे. त्यामुळेच बैठक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही त्याचे आयोजन करू शकत नसाल तर इस्लामिक देशांची बैठक बोलवावी, यासाठी मी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे आग्रह धरेन. कारण इस्लामिक देश काश्मीर मुद्द्यावर एकजूट दाखवण्यास तयार असल्याचा दावाही कुरेशी यांनी केला. कुरेशी यांचे हे विधान एक प्रकारे धमकीवजा आहे. पाकिस्तान आता प्रतीक्षा करू शकत नाही, असे कुरेशी यांनी अन्य प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. दरम्यान, काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर ५७ मुस्लिम देशांच्या बैठक बोलावण्यासाठी सौदीवर दबाव टाकत आहे.

दोन प्रसंगांत आयओसी पाकसोबत दिसले

जून -2020

ओआयसी सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या आणीबाणीच्या बैठकीत भारताबद्दलची भूमिका मांडण्यात आली होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरबद्दल भारताने घेतलेला निर्णय व नागरिकत्वाचे नवे नियम हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारे आहेत. चौथ्या जिनिव्हा सामंजस्य करारातील नियमांचीही त्यातून पायमल्ली झाल्याचे आेआयसीने म्हटले होते. त्याशिवाय सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव कराराविषयीची बांधिलकीही माेडली.

डिसेंबर- 2019

भारतातील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आेआयसीने वक्तव्य जारी केले होते. सरचिटणीस युसूफ बिन अहमद बिन अब्दुल रहमान यांच्या वतीने भारतावर भाष्य करण्यात आले होते. ‘भारतातील अलीकडच्या घटनाक्रमावर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. त्याचा फटका अल्पसंख्याकांना बसला. नागरिकत्वाचा अधिकार व बाबरी मशीद खटल्याविषयी आम्ही चिंतित आहोत. भारतात मुस्लिम व पवित्र ठिकाणे यांची सुरक्षा निश्चित केली जावी, याचा आम्ही पुनरुच्चार करतो’.

काश्मीर द्विपक्षीय मुद्दा : यूएनएससी सदस्य

संयुक्त राष्ट्र । पाकिस्तानने आपले मित्रराष्ट्र चीनच्या मदतीने जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या मंचावर मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र या व्यासपीठावर पाकला पुन्हा झटका बसला. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर अनौपचारिक सत्रात चर्चा केली. बंद खोलीत चर्चा झाली. त्याचे काहीही रेकॉर्ड ठेवले गेले नाही. त्यावर कोणतेही विधान जारी झाले नाही. याआधी पाकिस्तानने दोन वेळा काश्मीर मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता पाकिस्तानचा मनसुबा अयशस्वी झाला. भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत त्रिमूर्ती यांनी एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले- पाकिस्तानचा आणखी एक प्रयत्न अयशस्वी ठरला. बैठक बंद खोलीत झाली. त्याचे स्वरूप अनौपचारिक होते. त्यातून काही निष्कर्ष निघाला नाही. जवळपास सर्वच देशांनी काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे मान्य केले. त्यासाठी सुरक्षा परिषदेचा वेळ देण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...