आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्ट्रेलिया:सिडनी ऑस्ट्रेलियन शहर फक्त सौर-पवनऊर्जेवर चालते, कार्बन ७०% घटले

सिडनी10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2011 मध्ये ऑस्ट्रेलियातील पहिले प्रमाणित कार्बन न्यूट्रल शहर झाले

ऑस्ट्रेलियातील सिटी ऑफ सिडनी १०० % सौरव पवनऊर्जेवर चालणारे शहर झाले आहे. आता येथील न्यू साऊथ वेल्समध्ये तयार झालेल्या एका विंड व दोन सौर फार्म्सपासून उत्पादित ऊर्जेवर संपूर्ण शहर चालते.

यामुळे शहरातील दरवर्षी २० हजार टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यात यश मिळेल. सिटी आॅफ सिडनीमध्ये सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट व अनेक निवासी वसाहती आहेत. येथील लोकसंख्या २.५ लाख इतकी आहे.

हरित ऊर्जेवर चालणार : 

शहरातील सर्व कार्य म्हणजे २३ हजार पथदिवे, पाच स्विमिंग पूल, ७५ पार्क, क्रीडांगणे व ११५ इमारतीवरील कामे नव्या ऊर्जेने होणार आहेत. या इमारतीत वाचनालये, समाज मंदिरे व महापालिकेच्या इमारतीसह ऐतिहासिक इमारत सिडनी टाऊन हॉलचा समावेश आहे. महापौर क्लोव्हर मूर यांनी सांगितले, जगभरातील शहरे ७०% ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन करतात. आमचे उद्दिष्ट २०३० पर्यंत ७०% कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे होते. २०२४ मध्येच आम्ही ते साध्य करू.

बातम्या आणखी आहेत...