आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्किपिंग शीख:'सर्वोत्तम व्यायाम म्हणजे स्किपिंग, यासाठी ताकद नव्हे तर क्षमतेची गरज' 73 वर्षीय राजेंद्रसिंग यांचे मत

लंडन3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बंद काळात दोरीच्या उड्या घेत प्रेरणा देणारे ‘स्किपिंग शीख’

कोविड - १९च्या लॉकडाऊनमुळे बहुतांश लोक कामाचे नियोजन न केल्याने चिंतेत आहेत.मात्र ब्रिटनमध्ये राहणाऱ्या ७३ वर्षीय राजेंद्रसिंग  हे फक्त दोरीवरच्या उड्या मारून एकदम ठणठणीत  राहतात. त्यांची उत्तम प्रकृती पाहता, ते इतर लोकांसाठी प्रेरणा ठरले आहेत.  राजेंद्रसिंग दोरीवरून उड्या मारत असतानाचा  व्हिडिओ काही दिवसापूर्वी त्यांची मुलगी मिन कौर यांनी साेशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडिओला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मिडलसेक्समध्ये राहणारे राजेंद्रसिंग यांनी सांगितले, दाेरीवरच्या उड्या हा परिपूर्ण असा व्यायाम आहे. कोणत्याही वयातील व्यक्ती ते करू शकते. घरात किंवा बागेतही दोरीवरच्या उड्या मारू शकता, असे ते म्हणाले. 

‘दोरीवरच्या उड्या खूप आवडतात, त्यामुळे आनंद मिळतो तोच मी देतो’

सेवानिवृत्त वाहन चालक राजेंद्रसिंग यांना  दोन मुले  व दोन नातवंडे आहेत. सक्षम राहण्यासाठी ते नेहमी व्यायाम करतात. अनेक मॅरेथॉनमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. याशिवाय नियमित व्यायाम करतात. त्यांना सायकलिंग आवडते. राजेंद्रसिंग म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात सर्वात मोठी समस्या अशी की, लोक घरात राहून आळशी होतील. रिकाम्या वेळेत करायचे तरी काय? हाच विचार करत वेळ वाया घालवतात. मी अशा लोकांना थोडा आनंद मिळवून देतो. तो आनंद मला दोरीवरच्या उड्या मारून मिळतो. मी आशियन व शीख समाजातील लोकांना व्यायाम करण्यासाठी प्रेरित करू इच्छितो. यात लोकांना किती आनंद मिळतो, हे त्यांनाही समजेल. या वयात दोरीवरच्या उड्या मारण्याचे इतके वेड असणे चांगले नाही. तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवत आहात. पण दोरीवरच्या उड्या मारण्याची आवड आहे. त्यामुळे मला आनंद मिळतो. 

राजेंद्रची मुलगी मिन यांनी सांगितले,  मी वडिलांचा दोरीवरच्या उड्या घेतानाचा व्हिडिओ सहज पोस्ट केला होता. तो जगभरात व्हायरल झाला. त्यास प्रतिसादही खूप चांगला मिळाला. तुला वडिलांबद्दल गर्व वाटला पाहिजे, असे काही लोकांनी म्हटले. तुझ्या वडिलांनी मला हात धरून दोरीवरच्या उड्या मारायला शिकवले, असे सांगणारेही बरेच लोक भेटले. त्यांचे वय माझ्यापेक्षा दुपटीने जास्त असूनही ते स्पर्धेत मला मागे टाकू शकतात. माझी आई प्रितपाल कौर हिने आयुष्यात कधी दोरीवरच्या उड्या मारल्या नसतील पण तिलाही दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी तयार केले. माझ्या वडिलांंची स्टाइल थोडी वेगळी आहे. पण लोक म्हणतात ते खूप छान दिसतात. 

बातम्या आणखी आहेत...