आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • The Biggest Sign Of Backward Society Men Make Decisions Of Women There, Love Is The Most Powerful Way To Bring Change Melinda Gates

लर्निंग फ्रॉम बुक्स:मागासलेल्या समाजाची सर्वात स्पष्ट ओळख म्हणजे तेथे महिलांबाबत निर्णय पुरुष घेतात, बदलाचा सर्वात प्रभावी मार्ग केवळ प्रेमच आहे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘द मोमेंट ऑफ लिफ्ट’ पुस्तकात मेलिंडांना प्रेरणा देणाऱ्या महिलांचा उल्लेख

संसाधनांचे मार्ग सर्वांसाठी खुले करण्यासाठी स्वत:ला वेगळे व श्रेष्ठ समजणे सोडावे लागेल

मेलिंडा गेट्स यांचे ‘द मोमेंट ऑफ लिफ्ट- हाऊ एम्पॉवरिंग वुमन चेंज द वर्ल्ड’ हे न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्ट सेलिंग पुस्तक ठरले आहे. या पुस्तकात मेलिंडा यांनी त्यांना प्रेरणा दिलेल्या आणि प्रभावित केलेल्या महिलांविषयी लिहिले आहे. मेलिंडा यांनी महिलांच्या वैयक्तिक कामगिरीतून अनेक निष्कर्ष काढले आहेत. वाचा त्यांचे काही निवडक विचार-

संसाधनांचे मार्ग सर्वांसाठी खुले करण्यासाठी स्वत:ला वेगळे व श्रेष्ठ समजणे सोडावे लागेल

> प्रत्येक समुदायात महिलांना त्यांच्याच घरात परके समजले जाते ही अतिशय वाईट गोष्ट आहे. हा विचार सध्याचे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. ज्या लोकांवर आपण बहिष्कार टाकतो त्यांचीच आपल्याला भीती वाटते.

> एका मागासलेल्या समाजाची ओळख म्हणजे तेथे महिलांचे निर्णयही पुरुषच घेत असतात.

> जगात बदल घडवून आणण्याचा सर्वात प्रभावी मार्ग केवळ प्रेेम आहे. प्रेम म्हणजे इतरांना मदत करण्यासाठीचे माध्यम आहे. एखाद्याला सक्षम बनवण्याची सुरुवात त्याचा आत्मविश्वास वाढवण्यापासून होते. याचा अर्थ त्याने सर्व प्रथम स्वत:चा आदर करण्यास शिकायला हवे.

> संसाधनांचे मार्ग सर्वांसाठी खुले करावे लागतील. स्वत:स वेगळे आणि श्रेष्ठ समजणे आपल्याला सोडावे लागेल.

> गरजेपेक्षा जास्त संपत्ती अनेक भ्रम निर्माण करते. यामुळे आपण स्वत:ला श्रेष्ठ समजायला लागतो आणि विकृत होत जातो. विशेषत: पैसा कमावणे म्हणजे पात्रता कमावणे असे तुम्हाला वाटायला लागते.

> बुद्धिमत्ता म्हणजे जास्तीत जास्त तथ्य एकत्र करण्यात नव्हे, तर सत्य मनापासून स्वीकारण्यात आणि समजून घेण्यात आहे.

> जगातील दारिद्र्य आणि आजारामागील सर्वात मोठे कारण म्हणजे स्त्रियांवर आर्थिक आणि कायदेशीर बंधने लादण्याची संस्कृती आहे, असे माझ्या अनुभवातून मला जाणवले आहे.

> जेव्हा तुम्ही इतरांना काय वाटते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा समोरचा जे पाहत असतो ते तुम्ही पाहू लागता. तेव्हा तुम्ही एकमेकांना समजू शकता.

> तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करत नसाल तर कोणीतरी दुसरेच तुमचे हे काम करेल. जर मी माझ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींनुसार माझी कामे ठरवली नाही तर दुसरेच कोणीतरी त्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली कामे माझ्यासाठी निश्चित करेल.