आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावात होणारी डोकेदुखी सामान्य:संपूर्ण शरीराच्या वेदना अनुभवणाऱ्या मेंदूला स्वतःचे वेदना रिसेप्टर्स नसतात

वाॅशिंग्टन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोकेदुखी सामान्य बाब आहे. ती अनेक प्रकारची असते. हलकी किंवा त्रासदायक. काही मिनिटांपासून तर अनेक दिवस चालणारी. डोके दुखते तेव्हा असे गृहीत धरता येईल की त्याखाली स्थित मेंदूच्या ऊतींमध्ये वेदना होऊ शकतात. विशेष म्हणजे, संपूर्ण शरीरात वेदना जाणवणाऱ्या मेंदूला मात्र वेदनांसाठी स्वतःचे रिसेप्टर्स नाहीत. अशा परिस्थितीत डोकेदुखी काय आणि कशी होते, असा प्रश्न उपस्थित होतो.

टेनेसीमधील न्यूरोलॉजिस्ट आणि डोकेदुखी तज्ज्ञ डॉ. चार्ल्स क्लार्क म्हणतात की, बहुतेक डोकेदुखी प्रत्यक्षात इतरत्र वेदना होतात. जसे की सायनसमध्ये सूज, शर्करा स्तर कमी झाल्यास डोकेदुखी होऊ शकते. जबडा, खांदे व मानेसारख्या शरीराच्या इतर भागांतील समस्यांमुळे मेंदूच्या आजूबाजूच्या स्नायू आणि नसांमध्ये वेदना होऊ शकतात.

मायग्रेनची तीव्रता सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी न्यूरोलॉजिस्ट क्लार्क सांगतात की, मायग्रेन हा डोकेदुखीचाच एक प्रकार आहे. त्याची तीव्रता इतर डोकेदुखींपेक्षा वेगळी असते. ती जास्त तीव्र असत. हे सहसा अनुवांशिक असू शकते आणि मळमळीसारखे लक्षणे असतात.

बातम्या आणखी आहेत...