आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेनंतर ब्रिटनचे सर्वात सुरक्षित क्षेत्र:ब्रिटिश पंतप्रधान सुनक यांच्या सरकारी निवासस्थानाच्या गेटला कार धडकली

लंडन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारी निवासस्थान १० डाउनिंग स्ट्रीटच्या गेटवर कार आदळली. अपघातात कार आणि गेटचे नुकसान झाले. मात्र, कुणालाही दुखापत झाली नाही. लंडनच्या पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीला गुन्हेगारी नुकसान आणि धोकादायक वाहन चालवल्याच्या संशयावरून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४:२० च्या सुमारास व्हाइट हॉलवरील डाऊनिंग स्ट्रीटच्या गेटवर कार आदळली. यात कुणी जखमी झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळी एकाला अटक केली आहे.