आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील बहुतांश भागात मावळत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्सव सुरू झाला आहे. अनेक जण सुट्या घालवत तर काही दुकाने थाटत या उत्सवात सहभागी झाले आहेत. याच धर्तीवर तुर्कियमध्ये २०२२ च्या निरोपाची तयारी सध्या सुरू आहे. येथे इस्तंबूलमध्ये बोस्फोरस मशिदीच्या चहुबाजूने आतषबाजी केली. मशिदी आणि विशेष इमारती सजवण्यात आल्या आहेत. पर्यटन स्थळांवर झगमगाट करण्यात आला आहे. आतषबाजीची तयारी सुरू आहे. आर्टेंकंटच्या सागर किनाऱ्यावरील बोडरम शहरात २३ ते २५ डिसेंबरदरम्यान नववर्षाची बाजारपेठ सजली आहे.
अमेरिका : अमेरिकेत न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये दरवर्षी नववर्षाचा उत्साह असतो. यात हजारो लोक एकत्र येतात. येथेही आतषबाजी होते. याशिवाय नववर्षानिमित्त विशेष बाजारपेठेचेही आकर्षण असते.
ब्रिटन : लंडनमध्ये थेम्स नदी किनाऱ्यावर वर्षअखेरीस ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी लोक एकत्र येतात. नदीकिनाऱ्यावर आतषबाजी होते. वेस्टमिन्स्टर व वॉटरलू पुलावरून याचे मनमोहक दृश्य दिसते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.