आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महामारीच्या काळातील आव्हानांमुळे अनेक मातांनी शोधला नवा मार्ग; घर, शहर आणि नोकरी बदलून स्वप्न पूर्ण करण्याची तयारी

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आप्तांच्या मृत्यूमुळे किंवा जोडीदारापासून वेग‌ळे होऊनही निराश झाल्या नाहीत या महिला

अमेरिकेतील ओरेगॉन सिटीच्या सारा शेफर्ड यांनी महामारी आल्याने कुटुंबासह १९ फूट लांब व्हॅनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण ‌वेळ नोकरी सोडून फ्रीलान्सिंग सुरू केले. महामारीच्या काळात सारा यांच्यासारख्या मानसिक आणि आर्थिक समस्यांशी झुंजणाऱ्या अनेक महिलांनी विशेषत: मातांनी आयुष्याला नवा अर्थ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्रासदायक नात्यातून बाहेर पडणे, नावडती नोकरी सोडणे यांसारखे कठीण निर्णय घेतले. अशाच काही महिलांच्या या कथा...

आव्हानांसमोर झुकले नाही
महामारीच्या काही दिवस आधीच इदाहोच्या कॅथरीन स्वान्सन यांचा घटस्फोट झाला. त्यांना आठ, सहा आणि तीन वर्षांची मुले आहेत. त्यांच्या देखभालीसाठी त्यांनी पूर्णवेळ नोकरी सोडून कन्सल्टंटचे काम सुरू केले. महामारीच्या आधी त्यांनी पतीसोबत पोर्तुगालमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. पण आयुष्याने त्याआधीच नवे वळण घेतले. आता कॅथरीन मुलांसह पोर्तुगालला जाण्याचा विचार करत आहेत. त्या म्हणतात, हे सर्व आव्हानात्मक होते, पण मी हताश झाले नाही. आयुष्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

अडचणी संपतील
३९ वर्षीय मार्टिका ग्रीन या पती तसेच दोन आणि चार वर्षांच्या मुलींसह ऑकलंडमध्ये राहतात. महामारीच्या आधी त्यांनी मुलांसाठी पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यांना अटलांटात राहायचे होते. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. दरम्यान त्यांच्या सासूचे निधन झाले. त्यामुळे त्यांची सर्व योजना बारगळली. तरीही त्या सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतात. त्या म्हणाल्या, महामारीच्या काळात कुठल्याही आईचे जीवन कठीण आहे. पण अडचणींवर मात करेन आणि हा काळही निघून जाईल, असा मला विश्वास आहे.

सर्व चांगले असावे हे आवश्यक नाही
कर्करोगावर मात करणाऱ्या ५६ वर्षीय लिझा रिपर यांनी सांगितले की, पती आणि मुलीकडे लक्ष देता यावे यासाठी गेल्या फेब्रुवारीत मी ५ महिन्यांची जुनी नोकरी सोडली. नोटीस दिल्यानंतर दोन आठवड्यांनीच वडिलांचा मृत्यू झाला. डिसेंबरमध्ये संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला. २०० पेक्षा जास्त रिझ्युमे पाठवले, ५० मुलाखती दिल्या तेव्हा कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. लिझा व त्यांची मुलगी म्हणाल्या की, सर्व चांगले असावे हे आवश्यक नाही, अशी शिकवण यातून मिळाली.

शेवट चांगला तर सर्व चांगले
३३ वर्षीय सारा शेफर्ड सांगतात की, ७ वर्षांची मुलगी, नवजात मुलगा व दोन पाळीव प्राण्यांसह व्हॅनच्या प्रवासावर निघाले. पण झूम कॉलची समस्या, मुलांना झोपवण्याची अडचण यामुळे ही मोहीम तीन महिनेच चालली. वॉशिंग्टनच्या लॉन्ग बीचवर व्हॅन खराब झाली. आम्ही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...