आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयाॅर्क:गूढ संसर्गातून मुक्त मुलाने हृदयाघात, व्हेंटिलेटरच्या संघर्षालाही दिले तोंड

न्यूयाॅर्कएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • वडिलांनी सांगितली हकिगत, अमेरिकेत ८५ मुलांमध्ये लक्षणे

अमेरिकेत काेराेना संकटामध्येच मुलांमधील गूढ अशा संसर्गामुळे घबराट निर्माण झाली आहे. मुलांना नेमका काेणता आजार किंवा संसर्ग झाला हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही. काही तज्ञ याला काेराेनाशी जाेडू पाहत आहेत. काहींना हा दुर्मिळ कावासाकी डिसीज असल्याचे वाटते. या आजारात ताप, डाेळे-छातीत जळजळ, हातापायांवर सूज, शरीरावर डाग, श्वास घेण्यास त्रास हाेणे इत्यादी लक्षणे दिसतात. अमेरिकेतील ७ राज्यांत अशी लक्षणे असलेली सुमारे ८५ मुले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकीच एका ८ वर्षीय जेडन हर्डाेवर यांच्या कुटुंबाने हा निराेगी मुलगा आजारी पडल्याची व नंतर त्याला हृदयाघात कसा झाला आणि ताे मृत्यूच्या खाईतून कसा परतला याची हकिगत सांगितली. जेडनचे वडील राॅप हर्डाेवर म्हणाले, माझा मुलगा दाेन आठवड्यांपूर्वी अगदी ठणठणीत हाेता. परंतु एक दिवस अचानक त्याला खूप ताप आला. त्याला रुग्णालयात नेले तेव्हा डाॅक्टरांनी त्याला टाइलेनाॅल हे मुलांचे आैषध देऊन घरी पाठवले. काही दिवसांनी त्याचा ताप उतरला. आम्हाला वाटले ताे पूर्णपणे बरा झाला आहे. परंतु त्याला श्वास घेण्यास त्रास झाला. पुढेे ताे व्हेंटिलेटरवर संघर्ष करत हाेता. त्याची लक्षणे कावासाकी डिसिजसारखी हाेती, असे डाॅक्टरांनी सांगितले. अखेर संघर्षानंतर ताे परतला. आता ताे पूर्ण बरा हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...