आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Child Used To Wet The Diaper Again And Again, Thirst And Fatigue Too, Mother Learned From Google This Type 1 Diabetes

कॅलिफोर्निया:बाळ वारंवार डायपर ओले करायचे, तहान व थकवाही; गुगलवरून आईला समजले तो टाइप 1 डायबिटीज, आता लोकांना करते जागृत

कॅलिफोर्नियाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्नियातील कर्टनी मूर हिने वेळीच लक्षणे ओळखून 16 महिन्यांच्या मुलाला वाचवले

पालक मुलांच्या आरोग्याबाबत सजग असतातच, मात्र कॅलिफोर्नियाची कर्टनी मूर हिने १६ महिन्यांचा मुलगा मॅडॉक्सच्या शारीरिक हालचाली बघून काळजी घेतली नसती तर टाइप १ डायबिटीजच्या आजाराने त्याचा जीवही गेला असता. कर्टनीने पाहिले की मॅडॉक्स वारंवार डायपर आेले करतो आणि त्याला तहानही गरजेपेक्षा जास्त लागते. ताे खूप लवकर थकतो. मुलगा मॅडॉक्सच्या या हालचालींकडे कर्टनीने दुर्लक्ष न करता पती जॅसनला सांगितले. उन्हामुळे असे होत असेल असे त्यांना वाटले. मात्र थोडेसे अंतर गेल्यानंतर मॅडॉक्स थकायचा आणि सतत वजन घटत असल्याने कर्टनीला चिंता वाटू लागली.

गुगलवर शोधल्यानंतर तिला समजले की ही टाइप १ डायबिटीजची लक्षणे आहेत. ती लगेच मॅडॉक्सला घेऊन जवळच्या रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी सांगितले की, मॅडॉक्सच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ७०० च्या जवळ आहे, सुदृढ मुलाचे १०० ते १८० असायला हवे. डॉक्टरांनी असेही सांगितले की, मॅडॉक्सची पॅनक्रियाज खूप कमी इन्शुलिन तयार करतात. मॅडॉक्स ‘कीटोएसिडोसिस’ नावाच्या जीवघेण्या डायबिटीजने पीडित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो टाइप १ गटात येतो. यात शरीरात इन्शुलिन खूप कमी तयार होते, यामुळे साखरेचे ऊर्जेत रूपांतर होत नाही. दोन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर मॅडॉक्सला सोडण्यात आले. आता घरीच त्याच्या ब्लड शुगर व इन्शुलिनवर लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार ऑटो इम्युन असून त्यात शरीरातच प्रतिक्रिया होते, जी पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिन तयार करणाऱ्या सेल्सला मारून टाकते. यामुळे मुलाच्या शरीरातील इन्शुलिन घटते आणि त्यांना इन्शुलिनचा वेगळा डोस द्यावा लागतो. बालपण व किशोरावस्थेतच टाइप १ डायबिटीज लक्षात येतो. या आजारामुळे कमी वयातच लोक किडनी व हृदयाच्या आजाराला बळी जातात.

टाइप १ डायबिटीजने ग्रस्त १६ लाख मुलांसाठी सुरू केली मोहीम
जागृत पालक असल्याने कर्टनी व जेसनने आपले कर्तव्य ओळखले. मुलाला वाचवल्यानंतर आता ते अमेरिकेत टाइप १ डायबिटीजने प्रभावित १६ लाख मुलांना निरोगी ठेवण्यासाठी मोहीम राबवत आहेत. या आजाराची लक्षणे इतर पालकांना सांगत त्यांना अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला देत शक्य ती मदतही करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...