आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुले स्वत:ची कामे करू शकतात, मदतही करू शकतात... परंतु करत नाहीत. आईवडील नेहमीच अडचणीचा सामना करतात. प्रकरण समजून सांगण्यापासून ते मारहाणीपर्यंत पोहोचते. तरी प्रश्न कायम.. तुमची मुले काम ऐकतील यासाठी बोलण्याची पद्धत बदलून किंवा त्यांना आठवण करून देणे परिणामकारक ठरू शकते. परंतु प्रश्न सुटतच नाही. वारंवार आठवण करून देण्याने किंवा निराश होण्याचा अर्थच असा की तुमची पद्धती याेग्य नाही. यावर पालकत्व तज्ज्ञ काय सांगतात ते बघू.
जवळ बसून सांगा की काम जीवनाचा भाग आहे
कुटुंबात एका दिवसात किती कामे करावी लागतात हे मुलांना माहीत नसते. “द गुड न्यूज अबाउट बॅड बिहेवियर’च्या लेखिका कॅथरीन रेनॉल्ड्स लुईस म्हणाल्या, कुटुंबासोबत बसून चर्चा करणे प्रभावी ठरू शकते. त्यांना केल्या जाणाऱ्या कामांची यादी दाखवा. या कामांत सहभागी करून घ्या.
चिडचिड होतेय... यंत्रणेत काही तरी गडबड आहे
वस्तू जागेवर न ठेवणे, छोटी कामे न केल्याने मुलांवर चिडणे साहजिक आहे. ‘इक्वल पार्टनर्स : इम्प्रूव्हिंग जेंडर इक्वॅलिटी अॅट होम’च्या लेखिका केट मँगिनो सांगतात, याचाच अर्थ तुमची यंत्रणा योग्य नाही. मुलांना त्यांची भूमिका सांगा, पण चिडचिड करू नका. त्रस्त झालात तेव्हा थोडे शांत रहा.
मुलांसंबंधीच्या निर्णयांत त्यांनाही सहभागी करा
‘अनकंडिशनल पॅरेंटिंग’चे लेखक एल्फी कोहेन म्हणाले, घरातील मोठे निर्णय घेऊन मुलांकडून अंमलबजावणीची अपेक्षा करतात. संघर्ष सुरू होतो. प्रश्न सुटण्यावर भर द्या. मुलांच्या भावनांचा सन्मान करत त्यांना समजून सांगा की अमुक काम केले असते तर किती चांगले झाले असते.
काम सांगून भागणार नाही, शिकवा
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे असो. प्रोफेसर स्टुअर्ट एब्लॉन म्हणतात, ८ वर्षांपर्यंतच्या मुलांवर पूर्णपणे काम सोपवण्याऐवजी त्यांच्या सोबतीने काम करा. ८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनाही सुरुवातीला मदत करण्यासह शिकवण्याचीही गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.