आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीन:कम्युनिस्ट सरकारने 16 हजारांवर मशिदी पाडल्या, पाकिस्तानातील मुस्लिमांनाही मोठी झळ

शियजियांग7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उइगर संस्कृती व इतिहास नष्ट करण्यासाठी 16 हजारांहून जास्त मशिदी, मजार व इतर धार्मिक स्थळे नष्ट केली

उइगर मुस्लिमांचा सफाया करण्याचे काम चीनमधील कम्युनिस्ट सरकारने हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांत उइगर संस्कृती व इतिहास नष्ट करण्यासाठी १६ हजारांहून जास्त मशिदी, मजार व इतर धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. काहींमध्ये प्रवेशबंदी आहे.

आॅस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पाॅलिसी इन्स्टिट्यूटच्या (एएसपीआय) एका अहवालानुसार चीनच्या शिनजियांग प्रांतात २०१७ नंतर ८५०० हून जास्त मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नेथन रुजर यांच्या नेतृत्वाखाली टीमने मुस्लिमांची धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणे नष्ट केली आहेत. हा उइगर संस्कृतीला मिटवण्याचा जाणूनबुजून केलेला कट आहे. १९६६ मध्ये माआे त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली अनेक धार्मिक ठिकाणे व मशिदी पाडण्यात आल्या हाेत्या. एएसपीआयचा अहवाल शिनजियांगमधील ५३३ मशिदींच्या साइटच्या नसून निवडीवर आधारित आहे. वेगवेगळ्या काळात विविध ठिकाणांवर घेण्यात आलेल्या उपग्रहाच्या छायाचित्रात बदल स्पष्ट दिसून आला आहे. अनेक ठिकाणांवर मशिदींना पाडून उद्याने व क्रीडा मैदाने तयार करण्यात आली. शिनजियांग प्रांतात एका मशिदीला पाडून तेथे सार्वजनिक शाैचालय तयार करण्यात आले आहे.

पाकिस्तानातील मुस्लिमांनाही मोठी झळ

उइगर मुस्लिमांवर चिनी अत्याचाराच्या झळा पाकिस्तानपर्यंत पाेहाेचल्या आहेत. सिकंदर हयात यांच्याबाबतीत असेच एक प्रकरण उजेडात आले आहे. हयात यांच्या पत्नीला चिनी सरकारने २०१७ पासून शिनजियांग प्रांतात बंदिवासात ठेवले आहे. हयात मुलगा अराफतसह पाकिस्तानात पळून आला हाेता. परंतु नंतर ताे मुलासह चीनच्या सीमेवर गेला. तेव्हा चिनी पाेलिसांनी चाैकशीसाठी त्याच्या मुलास ताब्यात घेतले आणि आठवडाभरात साेडून देण्यात येईल असे सांगितले. परंतु सिकंदरला पत्नी व मुलाची आतापर्यंत काही माहिती मिळू शकलेली नाही. चीनच्या सांस्कृतिक नरसंहाराचे हयात यांच्यासारखे अनेक पाकिस्तानी शिकार झालेले आहेत. त्यांना पत्नी व मुलापासून विलग करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...