आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीजिंग:चीन सरकारची आता 3 अपत्यास परवानगी, 141 काेटी लाेकसंख्येच्या देशात अपत्य धाेरण बदलले

बीजिंग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात सर्वाधिक लाेकसंख्या असलेल्या चीनला वृद्धत्वाची भीती वाटू लागली आहे असे वाटते. कारण चीनने पुन्हा अपत्य धाेरणात बदल करून तीन अपत्यांसाठी परवानगी दिली आहे. तीन अपत्यांसाठी दांपत्याला प्राेत्साहन दिले जाणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. चीनमध्ये दीर्घकाळापासून एक अपत्य धाेरण लागू हाेते. काही वर्षांत चीनमधील माेठा समुदाय वृद्धत्वाकडे झुकत चालला आहे आणि जन्मदर मात्र घटत आहे. त्यामुळे सरकारच्या पातळीवर हा चिंतेचा विषय ठरला हाेता. देशातील वाढणारा वृद्धत्व वर्ग आणि वेगाने घटणारा जन्मदर राेखण्याच्या उद्देशाने सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीकडून तीन अपत्यांच्या धाेरणाला शुक्रवारी हिरवा कंदील दाखवण्यात आला. अहवालानुसार २०१६ मध्ये चीनने अनेक दशकांपूर्वीच्या अपत्य धाेरणाला परवानगी दिली हाेती. तेव्हा दाेन अपत्यांसाठी परवानगी हाेती. आता अपत्य धाेरणात पुन्हा बदल करण्यात येत आहे. यंदा मेमध्ये सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आॅफ चायनाने दाेन मुलांच्या आपल्या कडक धाेरणात सवलत देऊन तीन अपत्यांसाठी परवानगी दिली हाेती.

नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या (एनसीपी) स्थायी समितीने लाेकसंख्या व कुटुंब नियाेजन कायद्यात दुरुस्तीला पारित केले. त्याचबराेबर कायद्यात दाम्पत्यांना सामाजिक, आर्थिक सहकार्य करण्याची उपाययाेजनाही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे दाम्पत्याला संगाेपनात आर्थिक अडचणींना ताेंड देण्याची वेळ येणार नाही. जास्त अपत्ये असलेल्या कुटुंबांचा आर्थिक बाेजा कमी करण्यासाठी शिक्षण, घर व राेजगारात सहकार्य केले जाणार आहे.

६० वर्षांहून जास्त वयाची लाेकसंख्या २६ काेटींवर
तीन दशके एक अपत्य धाेरणामुळे ४० काेटी लाेकसंख्या राेखली गेली. १० वर्षांत एकदा हाेणाऱ्या जनगणनेत हे आकडे जाहीर झाले हाेते. त्यावरून चिनी लाेकसंख्या अत्यंत कमी वेगाने १४१.२ काेटींपर्यंत पाेहाेचल्याचे लक्षात आले. नवीन आकडेवारीनुसार चीनमध्ये साठीहून जास्त वय असलेली संख्या २६.४ काेटींच्या घरात गेली आहे. पुढील पाच वर्षांत चीनच्या एक चतुर्थांश लाेकसंख्येचे वय ६५ वर्षांहून जास्त हाेईल. त्यामुळे देशात काम करू शकणारी लाेकसंख्या कमी असेल. त्यामुळे माेठे संकट आेढवेल. त्यामुळेच चीन सरकारने धाेरणात बदल केला.

बातम्या आणखी आहेत...