आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौप्यस्फोट:सीआयएला 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची कल्पना, पण राेखण्यात अपयश

न्यूयॉर्क / मोहम्मद अलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची सीआयए ही गुप्तचर संस्था जगातील सर्वात बलाढ्य व वेगवान गुप्तचर संस्थांमध्ये समाविष्ट हाेते. परंतु या संस्थेची आजवरची कामगिरी तसेच प्रतिमा ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कायमची डागाळली. हल्ल्याबाबत सीआयएला पूर्वीच कल्पना हाेती. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या गाेपनीय दस्तएेवजानंतर ही माहिती उघड झाली. दहशतवादी हल्ला काेणत्याही दहशतवाद्यांनी केला याबद्दलही सीआयएला माहिती हाेती. हल्लेखाेर अमेरिकेत असून सामान्य लाेकांप्रमाणे ते सर्वत्र भटकंती करत असल्याचेही सीआयएला ठाऊक हाेते. दहशतवादी हल्ल्याचीदेखील कल्पना आली हाेती. परंतु बेजबाबदारपणा किंवा अति आत्मविश्वास असल्यामुळे बहुदा वेळीच दक्षता घेऊन कारवाई झाली नसावी. मग व्हायचे तेच झाले. महाशक्ती मानल्या जाणाऱ्या देशात जगातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. तारीख -११ सप्टेंबर २००१.

दहशतवाद्यांनी अमेरिकेची शान असलेले वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दाेन इमारती प्रवासी विमान घुसवून उडवून दिल्या. त्यात तीन हजारावर लोकांना प्राण गमवावे लागले. अमेरिकेच्या प्रशासनाने जाहीर केलेल्या गाेपनीय फायली एफबीआयच्या आहेत. एफबीआय अमेरिकेचे अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. त्यानुसार अल-कायदाचे दाेन दहशतवादी हानी हँजुर, नवफ अल-हाजमी जून २००१ मध्ये अमेरिकेला आले हाेते. दाेघांनी स्वत:ची आेळख न्यूजर्सीतील खासगी संस्थेचा कर्मचारी अशी सांगितली हाेती. त्यांनी सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत फाेर्ट लीमध्ये मेल बाॅक्स क्रमांक-४१७ भाड्याने घेतला हाेता. त्यात दहशतवादी हल्ल्याच्या कटाबाबतचे पत्र, इतर सामग्री सातत्याने येत हाेती. त्यांनी बँक खातेही सुरू केले. . ते सगळे अमेरिकी समाजातील खुलेपणाचा फायदा घेऊन तेथे राहिले. भटकले. फिरण्यासाठी कार भाड्याने घेतली. सामान्य लाेकांप्रमाणे लंच-डिनर, मनाेरंजन, जिम, खरेदी सगळे केले. साेबतच हल्ल्याची तयारीही करत राहिले. परंतु त्यांचा काेणाला संशय आला नाही. त्यांनी स्वत:ची आेळख लपवली नव्हती.

आग्नेय आशियात हल्ल्याचा सीआयएचा हाेता अंदाज
सीआयएला दहशतवाद्यांच्या कारवाया व त्यांच्या कटाबद्दलही माहिती हाेती. परंतु त्यांना दहशतवाद्यांच्या या कारवाया आग्नेय आशियातील संभाव्य हल्ल्यांसाठी असाव्यात, असा अंदाज सीआयएने लावला हाेता. राॅसिनी यांच्या म्हणण्यानुसार ९/११ च्या काही आठवडे आधी सीआयएला हल्ला अमेरिकेतच हाेणार असल्याचा पूर्ण अंदाज आला. एफबीआयला माहिती मिळाली. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

सीआएएची दाेन दहशतवाद्यांवर आशिया, मलेशियातही नजर
९/११ साठी जबाबदार असलेल्या अल-कायदाच्या अल हाजमी व खालिद अल -मिहरदारवर सीआयएने नजर ठेवली हाेती. मध्य आशिया, थायलंड नंतर लाॅस एंजलिसपर्यंत निगराणी करण्यात आली. पुढे त्यांच्यावरील नजर हटवण्यात आली. परंतु एफबीआयचे विशेष एजंट मार्क राॅसिनी यांना दहशतवाद्यांबद्दलची पुसट कल्पना मिळाली. परंतु त्यांना गोपनीयतेचा हवाला देऊन गप्प केले गेले.

बातम्या आणखी आहेत...