आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:सीपेक प्रकल्पामुळे ग्वाडरच्या 90 टक्के मच्छीमारांसमोर रोजगाराचे संकट शक्य

ग्वाडर / नासिर अब्बासी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्वाडरमध्ये मासेमारीवर लोकांचा उदरनिर्वाह

ग्वाडर पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमेकडील सीमेवर वसलेले बंदरांचे शहर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. चीन येथे ६० अब्ज डॉलर (सुमारे ४ लाख ४५ हजार कोटी रुपये) खर्चून सीपेक अर्थात चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर उभा करत आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड प्रकल्पाचा हा भाग आहे. या प्रकल्पात रस्ते, वीज व्यवस्था, कृषी विकास इत्यादी पैलूंचाही समावेश आहे. सीपेक पाकिस्तानसाठी सर्वात मोठी योजना ठरू शकते. कारण या प्रकल्पामुळे पाकिस्तानात बंदरे, रस्ते विकसित होतील. परंतु ग्वाडरचे ९० टक्के लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत. ग्वाडरमध्ये सुमारे २.६५ लाख लोक राहतात. त्यात बहुतांश मच्छीमार आहेत. या मच्छीमारांना आपल्या क्षेत्रात पाणी, वीज, नोकरी, शिक्षण इत्यादी सुविधा हव्या आहेत. परंतु सीपेक प्रकल्प त्यांच्यावर रोजगाराचे संकट आणू पाहतोय. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी तीन दिवसांपासून प्रमुख रस्त्यांवर धरणे आंदोलन केले जात आहे.

सीपेक प्रकल्प बंद करण्याची त्यांची मागणी आहे. कारण हा प्रकल्प तयार झाल्यावर मुख्य बंदर व व्यापारी शहर कराचीहून अफगाणिस्तान व इराणपर्यंत कच्चा माल व रसद घेऊन जाणाऱ्या ट्रक वाहतुकीस अडचणींना तोंड द्यावे लागेल. ग्वाडरच्या बहुतांश लोकांकडे मासेमारी करण्यापलिकडे काही काम नाही, असे स्थानिक नेते मौलाना हिदायत-उर-रहेमान यांनी सांगितले. सागरी क्षेत्रात विकास प्रकल्प तसेच चीनी लोकांच्या हस्तक्षेपामुळे मासेमारीच्या व्यवसायात अडथळे निर्माण झाले आहेत. चीनच्या ट्रॉलरने स्थानिक मासेमारांच्या उदरनिर्वाह अडचणीत आणला. ट्रॉलरमुळे माशांच्या प्रजननावर परिणाम होतो. त्याचबरोबर त्यांच्या प्रजातीही नष्ट होतात. मासेच शिल्लक राहिले नाहीतर उदरनिर्वाह कसा करणार? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. सीपेक प्रकल्प सुरू झाल्यानंतर चीनचे मासेमार अरब समुद्रापर्यंत पाकिस्तानातही येऊ शकतील. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

एक महिन्यात दोन हल्ले, १६ जणांचा मृत्यू
सीपेक प्रकल्पाशी संबंधित कर्मचाऱ्यांवर एक महिन्यात दोन हल्ले झाले. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात ९ चीनी नागरिकांचा समावेश होता. दुसरा हल्ला शुक्रवारी झाला. त्यात तीन जणांनी प्राण गमावले. एक चिनी नागरिक जखमी झाला. आधी ९ चिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. शुक्रवारच्या हल्ल्या प्रकरणात ५ जणांना अटक झाली.

बातम्या आणखी आहेत...