आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:जंगलात वणवा पेटल्याने फीनिक्स शहर खाक, केवळ दुकानांचे अवशेष शिल्लक

फीनिक्स3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अग्नीशमन दलाचे 1 हजार कर्मचारी आग विझवण्यासाठी तैनात आहेत

छायाचित्र अमेरिकेतील ओरेगन राज्यातील फीनिक्स शहराचे आहे. जंगलातील वणव्यामुळे शहर उद्ध्वस्त झाले आहे. वणव्यामुळे या शहरातील सुमारे २५०० घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सुमारे १० हजार लोकांना बेघर व्हावे लागले आहे. फीनिक्सचे शेजारी शहर टॅलेंटमध्ये १८८० घरे खाक झाली आहेत. पूर्ण ओरेगन राज्यात ३७५० वर्ग किमी क्षेत्रात वणवा पेटला आहे. यामुळे ४० हजार लोक बेघर झाले आहेत, तर सुमारे ५ लाख लोकांना सुरक्षित स्थानी जाण्यास सांगण्यात आले आहे. यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. नुकसानीमुळे राज्यातील अग्निशमन दलाचे प्रमुख फायर मार्शल जिम वॉकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया, वॉशिंग्टनसह १२ राज्ये वणव्याच्या विळख्यात आहेत.