आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली. शहरात ५० हजारांवर कोरोनाबाधित आढळल्याचे चीनने जगाला सांगितले होते. मात्र आता नव्या अभ्यासानुसार खरा आकडा दहापट जास्त होता. म्हणजेच वुहानमध्ये सुमारे ५ लाख लोक कोरोनाबाधित होते. ही माहिती स्वत: चीनच्या आरोग्य विभागाने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने वुहानमध्ये ३४ हजारांहून जास्त लोकांची सेरोलॉजिकल पाहणी केली. त्यापैकी ४.४ टक्के लोकांमध्ये कोरोनाचा सामना करणाऱ्या अँटिबॉडी आढळून आल्या आहेत. त्यावरून हे लोक बाधित झाले होते हे स्पष्ट झाले. सरासरीला वुहानच्या संपूर्ण लोकसंख्येशी लागू केल्यास सुमारे ५ लाख लोक बाधित असल्याचे लक्षात येते. महामारीला वाईट पद्धतीने हाताळल्यामुळे चीनवर जगभरातून टीका झाली. चीनच्या दुर्लक्षामुळे ही महामारी वाढल्याचा आरोपही केला जातो. संसर्गजन्य आजाराच्या संसर्गाचे मूळ कारण शोधण्यासाठी सेरोलॉजिकल पाहणी केली जाते.
ऑस्ट्रेलिया : पूर्वसंध्येला नियम कडक
ऑस्ट्रेलियाने दीर्घकाळ कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यात यश मिळवले होते, परंतु काही दिवसांपासून काही शहरांत त्यातही सिडनीत बाधित वाढले आहेत. त्यामुळे सिडनीत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नियम आणखी कडक करण्यात आले. आता तेथे एक कुटुंब कमाल १० पाहुण्यांना आमंत्रित करू शकते. सिडनीच्या किनाऱ्यावर ब्रिटनमधून आलेले तरुण जल्लोष करतानाची छायाचित्रे झळकल्यानंतर नियम आणखी कडक झाले. ७ जानेवारीपासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला जाणार आहे.
अमेरिका : बाधितांचा आकडा २ कोटी पार
कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका झेलणाऱ्या अमेरिकेत बुधवारी बाधितांची संख्या दोन कोटींहून जास्त झाली. एवढी रुग्णसंख्या असलेला अमेरिका हा पहिला देश आहे. जगात आतापर्यंत ८.२४ कोटी देश आहेत. म्हणजेच बाधितांपैकी एक चतुर्थांश रुग्ण अमेरिकेत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या म्हणण्यानुसार मंगळवारी अमेरिकेत २,००,९०२ नवे रुग्ण उजेडात आले. दोन आठवड्यांपूर्वी दररोजच्या तुलनेत हे प्रमाण ११ टक्के कमी आहे. २९ डिसेंबरला ३६२६ लोकांचा मृत्यू झाला. युरोपात मंगळवारी २,०७,५७१ नवे रुग्ण समोर आले. पैकी ५,८९९ लोकांचा मृत्यू झाला.
श्रीमंत, गरीब देशांमध्ये अडकला दक्षिण आफ्रिका
सध्या जगातील अनेक श्रीमंत देशांत कोरोना लसीकरणास सुरुवात झाली. अनेक गरीब देश जागतिक आरोग्य संघटनेसह इतर संस्थांच्या मदतीने लस मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. या देशांव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका वेगळ्या परिस्थितीत अडकलेला आहे. लस तयार करण्याची क्षमता आफ्रिकेत नाही. परंतु एखाद्या संस्थेकडून लस घेऊ शकत नाही एवढी गरिबीही नाही. निम्मी लोकसंख्या गरिबीत जगते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.