आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामारीचे साइड इफेक्ट:कोरोनामुळे जगभरात गरीब-श्रीमंतांत मोठी दरी, लहान-लहान गोष्टींमुळे तंटे वाढले

बेलिंडा लसकाेम्बे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे सगळे जग जणू चिडचिडे बनले आहेत. लहान-लहान गाेष्टींवरून लाेकांचा संयम ढळू लागला असून त्याचे पर्यवसान भांडणात हाेत आहे. त्यामागे काेराेनाकाळात जगाचे बदललेले स्वरूप मानले जाते. जीवन काेराेनापूर्वीसारखे राहिले नाही. लाेकांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये एका फास्ट फूड रेस्तराँमध्ये भाेजन आॅनलाइन आॅर्डर करण्यावरून एका महिलेने कर्मचाऱ्यांवर बंदूक ताणली. टेक्सासमध्ये महिला ग्राहकाने महिला वेटरसाेबत लहान गाेष्टीवरून धक्काबुक्की केली. कनेक्टिकटमध्ये एका मुलाच्या आईने स्कूल बसचालकाला थापड लगावली. अशा घटना वाढू लागल्या आहेत. आता महामारी उतरणीला लागली आहे. परंतु या काळात अशा घटना घडू लागल्या आहेत.

जगभरात अशा घटना विविध समुदायात दिसू लागल्या आहेत. त्यामुळे समाजातील शालीन वागणूक पूर्ववत दिसू लागेल का? याबाबत शंका वाटू लागते. वकील, फ्लाइट अटेंडेंट व रेस्तराँचे कर्मचारी तंटेबखेडे करणाऱ्या ग्राहकांबद्दल तक्रारी करू लागले आहेत. अमेरिकेची संस्था एफएएने यंदा भांडखाेर विमान प्रवाशांकडून लाखाे रुपयांचा दंड वसूल केला आहे. इंडियाना विद्यापीठातील रुग्णालय व अमेरिकेतील अनेक राज्यांतील रेस्तराँमध्ये संयम साेडू नका असा सल्ला देणारे फलक पाहायला मिळू लागले आहेत. तुमची ऊर्जा चांगल्या कामासाठी खर्च करावी असा सल्ला दिला आहे. आेव्हरकमिंग डिस्ट्रक्टिव्ह बिहेव्हिअरचे लेखक बर्नाड गाेल्डल म्हणाले, काेराेना काळादरम्यान अनेक लाेकांनी आपल्या आप्तांना गमावले. नाेकऱ्याही गेल्या. अनेक लाेक आर्थिक िववंचनेत सापडले. अशा लाेकांच्या मनात एकप्रकारची संताप व नैराश्याची भावना आहे. स्टेनफाेर्ड विद्यापीठाचे प्राे. हँस स्टायनर म्हणाले, इतरांवर संताप व्यक्त करणे हा इतरांपेक्षा माेठे असल्याचे दाखवण्याचाही प्रयत्न असू शकताे. याद्वारे लाेक शक्ती दाखवण्याचाही प्रयत्न करतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांचा संताप दबून राहताे. म्हणूनच इंटरनेटवर हेट स्पीच ट्रेंड वाढणे हे देखील माेठे कारण सांगितले जाते.

हस्तांदाेलन नसल्याने अंतर वाढले
मेलबर्न विद्यापीठातील प्राे. स्टिव्हन जाक म्हणाले, काेराेनाकाळात लाेकांमध्ये भांडखाेरपणा वाढला आहे. त्यामागे हस्तांदाेलन बंद हाेण्याचे कारण सांगितले जाते. प्राे. जाक म्हणाले, हस्तांदाेलनामुळे लाेकांमध्ये समीपतेचा भाव येत हाेता. आता सगळे थांबले आहे. लाेकांमध्ये अंतर वाढले आहे. हस्तांदाेलन करणे ही शेकडाे वर्षांची सभ्य पद्धती हाेती. आता शारीरिक अंतर राखण्याच्या कारणामुळे हस्तांदाेलन बंद झाले. त्यामुळे परस्परांशी नेमके कसे वर्तन करायचे हे लाेकांना समजत नाही.

बातम्या आणखी आहेत...