आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेरचा थांबा...:कोरोनामुळे जहाज उद्योग उद्ध्वस्त, आता जहाजांचे तोडकाम

इजमिर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीमुळे गेल्या तीन महिन्यांत जहाज उद्योगाला 32 हजार 177 कोटी रुपयांचा फटका

छायाचित्र तुर्कीच्या इजमिर शहरातील आहे. ६५ हजार लोकसंख्येच्या अलिगा बंदरावर अमेरिका, ब्रिटन, इटलीसारख्या देशांतील लक्झरी क्रूझच्या तोडणीचे काम सुरू झाले आहे. कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळलेली हीच पाच जहाजे तसेच बोटी आहेत. या क्रूझ कोविड-१९ मुळे बदनाम झाल्या. मार्चमध्ये अमेरिकेच्या प्रशासनासह अनेक देशांनी या जहाजांना चालवू नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे ही जहाजे अनेक दिवसांपासून उभी होती. त्यामुळे ही जहाजे भंगार होत चालली होती. अखेर या जहाजांच्या मालकांनी आता त्यांचे तोडकाम करण्यासाठी त्यांची तुर्कीला रवानगी केली. लक्झरी जहाजांची दुरुस्ती अत्यंत महागडी असते. महामारीमुळे ही जहाजे चालवणे कठीण दिसू लागले आहे. म्हणून ते भंगारात काढण्यात आले आहे. अलिगा बंदरावरील जहाज फेरबांधणी उद्योगाचे अध्यक्ष कामिल आेनल म्हणाले, एकाच वेळी पाच लक्झरी जहाजांचे तोडकाम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. महामारीमुळे गेल्या तीन महिन्यांत जहाज उद्योगाला ३२ हजार १७७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...