आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्ग:पृष्ठभागावरील कोरोना सहज पसरू शकत नाही; सीडीसीचे स्पष्टीकरण

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • संसर्ग होण्यासाठी पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात विषाणू असणे गरजेचे

पृष्ठभागाला स्पर्श केल्याने कोरोनाचा प्रसार वेगाने होतो, असे सांगितले जात होते. मात्र आता पृष्ठभागावरील कोरोना तेवढ्या वेगाने पसरत नाही, जेवढे मानले जाते, असे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने स्पष्ट केले. यामुळे वस्तू आणल्यानंतर पिशवी सॅनिटाइझ करणाऱ्या किंवा वारंवार फरशी किंवा स्लॅब स्वच्छ करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

व्हर्जिनिया टेक विद्यापीठात एअरोसॉल शास्त्रज्ञ डॉ. लिन्से म्हणाले, संसर्ग होण्यासाठी पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात विषाणू असणे गरजेचे आहे. यानंतर इतर व्यक्ती जोपर्यंत पृष्ठभागाला स्पर्श करत नाही, तोपर्यंत विषाणू जिवंत राहणे गरजेचे आहे. जर विषाणूचे प्रमाण पुरेसे असेल व जर एखाद्याने स्पर्श केला असेल तरीही नाकाला, डोळ्याला किंवा तोंडाला स्पर्श होईपर्यंत त्या व्यक्तीच्या त्वचेवर विषाणू जिवंत राहणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...