आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनावरील लस:2021 च्या प्रारंभी लस उपलब्ध होणार - चिनी कंपनीचा दावा, अमेरिका, भारतासह जगभरात वितरण शक्य

बीजिंग7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाची लस तिसऱ्या व अंतिम टप्प्यात मानवी परीक्षणासाठी सज्ज

कोरोनावरील लस पुढील वर्षीपर्यंत तयार होईल, असा दावा चीनच्या एका कंपनीने केला आहे. सिनोवॅक नावाची कंपनी ‘कोरोनावॅक’ विकसित करत आहे. २०२१ च्या प्रारंभी अमेरिकेसह जगभरात त्याच्या वितरणाची तयारी पूर्ण केली जाईल. सिनोवॅक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यिन विडाँग यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची लस तिसऱ्या व अंतिम टप्प्यात मानवी परीक्षणासाठी सज्ज आहे. कोरोनावॅक लस तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील कसोटीवर उतरल्यास अमेरिकेत विक्रीसाठी अमेरिकेच्या आरोग्य सेवा नियामक ‘यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन’ कडे अर्ज केला जाईल.

आमचा उद्देश अमेरिका, युरोपीय संघासह जगभरात ही लस उपलब्ध करून देण्याचा आहे, असे यिन यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनेदेखील कोविड-१९ वरील लस तयार केल्याच्या दिशेने आणखी एक यश मिळवल्याचा दावा केला. कंपनी क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी नागरिकांना लसीच्या चाचणीच्या नोंदणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. दरम्यान, ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील संशोधक कोविड-१९ वरील लसीचे मानवी परीक्षण करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...