आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अमेरिकेत दांपत्य भरकटले; सुटकेसाठी भरमसाट शुल्क, लोकांची विनापाणी-टॉर्चशिवाय जंगल-डोंगरदऱ्यात भटकंती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाकाळात कंटाळवाणेपणा दूर करण्यासाठी डाेंगरदऱ्यात भटकंती करताना भरकटलेल्या दांपत्याला स्वत:च्या साेडवणुकीसाठी माेठी रक्कम द्यावी लागली. अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमध्ये हायकिंगसाठी दांपत्य घराबाहेर पडले. त्यांच्याकडे फ्लॅश लाइट आणि पिण्याचे पाणीदेखील नव्हते. त्यांनी सुटकेसाठी ९११ या क्रमांकावर काॅल केला. बचाव दलाचे चार सदस्य घटनास्थळी पाेहाेचले आणि दांपत्याला सकुशल घेऊन आले. आता त्यांना न्यू हॅम्पशायर प्रशासनाने बचावकार्यासाठी साडेतीन लाख रुपयांचे बिल दिले आहे.अमेरिकेत आता कंटाळा दूर करण्यासाठी वन क्षेत्रात किंवा दुर्गम भागात भटकणाऱ्यांकडून माेठे शुल्क वसूल केले जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. हवाई, इडाहाे, मेन, वेरमाँट, आेरगाॅनमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. साेडवणुकीच्या माेहिमेसाठी आवश्यक शुल्कवसुली करण्यासाठी कायदा तयार करण्यात आला आहे.

दक्षिण डकाेटामध्येदेखील अशाच प्रकारच्या कायद्यास मंजुरी देण्याची तयारी केली जात आहे. अमेरिकेत गेल्या दीड वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणे बंद असल्यामुळे लाेकांना घरात राहणे मानसिकदृष्ट्या अडचणीचे वाटू लागले हाेते. त्यामुळे आता लाेक घराबाहेर पडू लागले आहेत. परंतु घराबाहेर भटकताना अज्ञात ठिकाणी भटकंतीला पसंती दिली जात आहे. आई-वडील अशा भटकंतीवर निघून गेल्यावर मुले एकटी पडतात. अनेक लाेक शारीरिकदृष्ट्या बळकट नसतात, असे एका बचाव कर्मचाऱ्याने सांगितले. व्यावसायिक तसेच प्रशिक्षित लाेकांकडे भरकटलेल्यांना दुर्गम भागात मदत पाेहाेचवण्याचे तंत्र त्यांच्याकडे असते.

चुकीमुळे अडकल्यास शुल्कवसुली करणार?
अमेरिकेच्या अनेक राज्यांत आता सुटकेच्या नावावर शुल्कवसुली केली जात आहे. परंतु एखादी व्यक्ती किंवा लाेकांचा समूह काही चुकीमुळे भरकटल्यास त्यांच्या साेडवणुकीसाठीदेखील शुल्क वसूल केले जाणार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकारने आपल्या कल्याणकारी धाेरणांचे पालन करून शुल्कवसुली करणे टाळले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...