आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम युक्रेनच्या लवीव शहरातील एका घरात सध्या स्थलांतरितांची गर्दी पाहायला मिळते. हे घर आहे ८३ वर्षीय कवी इहोर केलिनेट्स यांचे. रशियाच्या छत्राखाली वास्तव्य काय असते याची त्यांना चांगली जाणीव आहे. लाचार झालेल्या लोकांना आश्रय देण्यासाठी केलिनेट्स यांनी आपल्या घराची दारे खुली केली आहेत. सोव्हिएतच्या काळात तीस वर्षांचे असताना केलिनेट्स यांनी लिहिलेल्या गोष्टी केवळ परदेशात प्रकाशित करणे शक्य होते. त्यांनी आपली लेखन साधना सुरूच ठेवली. आपले साहित्य त्यांनी भूमिगत प्रकाशन संस्था समिझत मार्फत गुपचूप प्रकाशित केले. त्यांना नऊ वर्षांची कैदही झाली होती. परंतु त्यांनी लेखन सुरूच ठेवले. तुरुंगात त्यांना दगड फोडण्याचे कठीण काम करावे लागत. परंतु केलिनेट्स यांची जिद्द अजोड होती. ते सिगारेट पाकिटाच्या कागदावर सुचलेले लिहायचे. लिहिलेले विचार ते लहान-लहान तुकड्यातून तुरुंगाबाहेर पाठवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या आयुष्यातील ही सर्वात दर्जेदार कलाकृती मानली जाते.
आतापर्यंत ४५ लाख लोकांचे पलायन
संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार देश सोडणाऱ्यांची संख्या ४५ लाखांवर आहे. २६ लाख पोलंडला गेले.
46वा दिवस दैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत रशिया-युक्रेन युद्धादरम्यान शनिवारी कैद्यांचे परस्परांत प्रत्यार्पण करण्यात आले. रशियाने त्यास दुजोरा दिला.
बुचाव्यतिरिक्त कीव्हजवळील गावांमध्ये अनेक सामूहिक कबरी आढळून आल्या आहेत. रशियन सैन्याने ताबा मिळवलेले हे क्षेत्र होते.
युक्रेनच्या सरकारी कार्यालयानुसार देशात रशियन हल्ल्यात १७७ मुलांचा मृत्यू झाला.
आता युक्रेनच्या उर्वरित भागावरील हल्ल्यांत वाढ झाली. परिस्थिती प्रतिकूल असूनही केलिनेट्स इतर देशात वास्तव्याला जाणार नाहीत. मी रशियाला घाबरत नाही. रशियन लोक येथे येऊ शकणार नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.