आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Craze Of Dating Reality Shows; However, Youth Are Not Interested In Marriage, 23% Decline In Marriages In 5 Years

दक्षिण कोरिया:डेटिंग रिअॅलिटी शोची धूम; मात्र, तरुणाईला लग्नामध्ये रस नाही, 5 वर्षांत लग्नांत 23% घट

सेऊल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण कोरियात जगातील सर्वात कमी प्रजनन दर आहे. डेटिंग आणि रोमान्सचे रिअॅलिटी शो देशात खूप पसंत केले जातात. तरुणाईमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत. मात्र, तरुणाईचे नाते लग्नात रूपांतरित होत नाहीत. गेल्या पाच वर्षांत नवदांपत्य जोडप्यांच्या संख्येत २३% ची घसरण आली आहे. यामागील अनेक कारणांत महागाई एक आहे. एका वृत्तानुसार, गेल्या वर्षी डेटिंग आणि रोमान्सवर कमीत कमी २० शो प्रसारित झाले जे २०२१ च्या तुलनेत तिप्पट होते. जोडीदार मिळणारे अनेक शो दक्षिण कोरियात सुरू आहेत, मात्र त्यापेक्षा जास्त शो सध्या समाज आणि बिगर परंपरागत नात्यांबाबत येत आहेत. त्यात लग्न आणि कुटुंबाचा समावेश नाही. “लिव्हिंग टुगेदर विदाऊट मॅरेज’ अशा जोडप्यांवर आहे, ज्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि “हिज मॅन’ एलजीबीटीक्यूवर केंद्रित आहे. याच पद्धतीने घटस्फोटित व्यक्तीना जोडीदार शोधण्यासाठी एक शो येत आहे.

बातम्या आणखी आहेत...