आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध व्यवसाय:बनावट कोरोना व्हॅक्सिनच्या पुरवठ्यातून गुन्हेगारी टोळी कमावते कोट्यवधी रुपये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंटरपोलच्या तपासणीतून अनेक देशांत तस्कर सक्रिय

ग्लोबल पोलिस एजन्सी इंटरपोलच्या म्हणण्यानुसार, काही संघटित गुन्हेगारी टोळ्या अवैध लस व्यवसाय चालवून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. वर्षभरापासून महामारीसंदर्भात इंटरपोल गुन्हेगारीचा शोध घेत आहे. एजन्सीचे सरचिटणीस जर्गन स्टॉक म्हणाले की, संकटाच्या वेळी गुन्हेगारीचे गट अशा प्रकारे पैसे कमावणारे यापूर्वी कधीही पाहिलेले नाहीत. या टोळ्या जगभरात विषाणूपासून फायदा करून घेत आहेत.

एजन्सीच्या तपास मोहिमेचे प्रमुख स्टॉक यांनी टाइम मासिकाला मुलाखतीत सांगितले की, गुन्हेगारी टोळी कोट्यवधी रुपये कमावत आहेत. गुन्हेगार खऱ्या लसी चोरी करण्याचा किंवा बनावट लस बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेवर बनावट लसींचा परिणाम होईल, असे मला वाटत नाही. तथापि, काही बनावट लसींच्या ऑनलाइन विक्रीची माहिती इंटरपोलला देण्यात आली आहे आणि काही तस्कर टोळ्यांमार्फत अन्य देशांना पुरवण्याचे काम करत आहे.

गेल्या आठवड्यात इंटरपोलने बनावट लसींचा पुरवठा केल्याची माहिती दिली होती. या प्रकरणात चीनमधील संघटित टोळीने दक्षिण आफ्रिकेला पाठविलेल्या लसींमध्ये सलाइन भरली होती. त्यांची कोविड-१९ लस म्हणून विकण्याची योजना होती. स्थानिक पोलिस आणि इंटरपोल एजंट्सनी सांगितले की, ८० पेक्षा जास्त लोकांना पकडले आहे. यातील बहुतांशी अटक चीनमध्ये झाली. बनावट लसींचे २४०० डोस जप्त केले आहे.

ज्या वेळी देशांतून प्रवास अथवा कामावर परतण्यासाठी लसीकरण पासपोर्टची सुविधा केली जाईल त्या वेळी फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. अशा सेवा डार्क वेबवर उपलब्ध आहेत, असे ते म्हणतात. हे लक्षात घ्या की, साथीच्या सुरुवातीच्या काळात अशा टोळ्यांनी रुग्णालये, प्रयोगशाळा आणि स्थानिक सरकारवर सायबर हल्ले केले. त्याच्या संगणकाची हॅकिंग नष्ट करण्यासाठी खंडणी मागितली होती. इटलीमधील नद्रनगेटा अपराधी कुटुंबासारख्या जुन्या गुन्हेगारी टोळ्यांना साथीच्या परिस्थितीचा फायदा झाला. स्टॉक म्हणतात, गेल्या एका वर्षात हे लक्षात आले की, हे गट एकमेकांकडून वेगवान शिकतात. जर आज ते जगाच्या एखाद्या भागात काही घडत असेल तर उद्या हे जगभर पसरेल.

लिक्विड गोल्ड आहे व्हायरसची व्हॅक्सिन
फ्रान्सच्या लिओनमधील इंटरपोलच्या मुख्यालयातील जर्गन स्टॉकने फोनवर सांगितले, बनावट औषधांच्या आधीच सुरू असलेल्या धंद्यामुळे अशा मोहिमेसाठी पाया तयार झाला आहे. महामारीच्या सुरुवातीस गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष बनावट मास्क, डिसइंफेक्टेंट व कोविड -१९ चाचणी कीटवर होते. आता त्यांचे लक्ष लसींच्या काळाबाजारावर आहे. स्टॉक म्हणतात, २०२१ मध्ये लिक्विड गोल्ड ही एक लस आहे. गुन्हेगारांनी पुरवठा साखळ्यांना लक्ष्य केलेे. शासकीय संस्था व सामान्य खरेदीदार काळ्या विपणनाचे बेकायदेशीर मार्केटिंगचे लक्ष्य होऊ शकतात. ज्या देशांत आरोग्य सेवांची पायाभूत सुविधा कमकुवत असतील तर ते गुन्हेगारांचे सहज बळी पडतील.

बातम्या आणखी आहेत...