आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइटलीतील सिसली भागातील कुख्यात माफिया गँगमधील गुन्हेगार ६१ वर्षीय गामिनोला गुगल मॅप्सद्वारे अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. वीस वर्षांनंतर गामिनोवर अटकेची कारवाई करण्यात यश मिळाले आहे. गामिनो हत्येच्या एका खटल्यात रोमच्या तुुरुंगात शिक्षा भोगत होता. २००२ पासून त्याने तुरुंगातून पलायन केले होते. तो पलायन करत असताना रोममधील त्या तुरुंगात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्याचा फायदा घेऊन तो पसार झाला होता. तेथून त्याने स्पेनमधील गालापगार गाठले.
येथे आल्यावर त्याने स्वत:ची आेळख मॅन्यूएल अशी सांगितली आणि तो एका रेस्तराँमध्ये कुक बनला. पोलिसांनी अटक करू नये म्हणून तो मोबाइल देखील बाळगत नव्हता. गालापगार येथील रेस्तराँमध्ये तो गामिनो पिज्झा तयार करू लागला. परंतु इटलीच्या माफियाप्रतिबंधक पोलिसांनी त्याचा शोध सुरूच ठेवला. याच काळात इटलीच्या पोलिसांना तो स्पेनमधील गालापगार शहरात दडून बसल्याचा सुगावा लागला. या काळात पोलिसांनी गालापगारमधील सार्वजनिक ठिकाणांच्या छायाचित्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली.
दहा वर्षांपासून कुटुंबाची भेट नाही, चेहऱ्यावरील खुणेमुळे आेळख पटली
डिसेंबरमध्ये पोलिसांना गुगल मॅप्सच्या छायाचित्रांच्या पडताळणीत चेहऱ्यावरील खुणेमुळे गामिनोची आेळख पटली. कारण एका छायाचित्रात त्याच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती आढळून आली होती. गालापगारमधील सर्व रेस्तराँच्या फेसबुकवरील पेजची पाहणी केली असता एका रेस्तराँच्या जुन्या छायाचित्रात गामिनो कुकच्या वेशात दिसून आला. चेहऱ्यावर जुने व्रण होते. दहा वर्षांपासून तो आपल्या कुटुंबाला देखील भेटला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.