आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया आणि चीनसोबत सुरू असलेल्या शीतयुद्धादरम्यान अमेरिकेने घातक बॉम्बवर्षक विमान तयार केले आहे. हे दोन दिवसांपूर्वी समोर आले. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टीन यांनी सांगितले की, बी-२१ अण्वस्त्रासोबत पारंपरिक दारूगोळा नेण्यास सक्षम आहे. पेंटागॉनमधील तज्ज्ञांनुसार, हे लढाऊ विमान रडारच्या कक्षेत न येता कोणतेही लक्ष्य भेदू शकते. अमेरिकेची ही मिशन खूप गोपनीय आहे. मिशन कसे होते,याची माहिती जाणून घेऊया...
{सर्वात घातक बी-२१ लढाऊ विमान काय आहे? रडारच्या टप्प्यात न येणारे बॉम्बवर्षक लढाऊ विमानांना स्टिल्थ विमानही म्हणतात. हे इतके चपटे असते की, रडारचे किरणे त्याला धडकून परत जाऊ शकत नाहीत.
{बी-२१ लढाऊ विमानाची किंमत किती आहे? याची निर्मिती करणारी कंपनी नॉर्थरोप ग्रुमॅन कॉर्पाेरेशननुसार, एका विमानाची किंमत ५६०० कोटी रुपयांहून जास्त आहे. कंपनी अमेरिकी एअरफोर्ससाठी १०० बी-२१ लढाऊ विमानांची निर्मिती करणार आहे.
{बी-२१ लढाऊ विमान निर्मितीदरम्यान गोपनीयता कशी ठेवली? पश्चिमेतील मोझावे वाळवंटात खूप गोपनीय पद्धतीने याची निर्मिती केली. त्याची सुरक्षा उपग्रहाद्वारे केली. ५८०० एकरात विस्तारलेल्या या भागात अहोरात्र लष्कर आणि पोलिस तैनात राहिले. कारखान्यांतील पार्किंगच्या भागात कर्मचारी येथे काम करायला जात होते. प्रवेशावेळी कर्मचाऱ्यांना कार्डने सेन्सर केले जात होते. त्यानंतर त्यांना आपल्या आकड्याचा कोड टाकावा लागत होता. या कोडनंतर त्यांना प्रवेश मिळत होता. त्यासाठी त्यांना मोबाइलसारखे उपकरण एका सेन्सर्ड बाॅक्समध्ये ठेवावे लागत होते. त्याचीही स्क्रिनिंग केली जात होती.
{अमेरिकेला बी-२१ लढाऊ विमानाची एवढी गरज का होती? गेल्या ४० वर्षांपासून अमेरिकेने कोणतेही लढाऊ विमान खरेदी केले नाही. अखेरचे बॉम्बवर्षक विमान १९८० मध्ये खरेदी केले होते. अमेरिकी हवाईदलाला १३२ विमाने हवी होती. त्यासाठी प्रत्येक विमानासाठी ४ हजार कोटी रु. देण्यास तयार होता. मात्र, त्यांना केवळ २१ बॉम्बवर्षक विमाने मिळाली. त्यापैकी एका विमानासाठी १.६२ लाख कोटी रु. द्यावे लागले. आता जेव्हा चीन आणि रशियात शस्त्र स्पर्धा सुरू झालेली असताना अत्याधुनिक शस्त्र स्वस्त किमतीत हवीत. यामुळे जास्तीत जास्त लढाऊ विमाने विकली जाऊ शकतील.
{अमेरिका बी-२१ कार्यक्रम यशाचा जुगार आहे का? अमेरिका बी-२१ केवळ एक स्टील्थ लढाऊ विमान नाही. एक संपूर्ण योजना आहे. याच्या निर्मितीवर लक्ष दिले जाते की, त्याची बनावट अशी असावी की, ते रडारच्या टप्प्यात येऊ नये. यामुळे याच्या निर्मितीवर खूप जास्त खर्च झाला आहे. चीन आणि रशियाच्या बॉम्बवर्षक विमानांपेक्षा जास्त चांगले असण्यासोबत ते रडार प्रणालीच्या टप्प्यात येत नाही हेच याचे यश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.