आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरिणीने माजी स्पेलर व राइस विद्यापीठातील विद्यार्थी ग्रेस वाॅल्टर्स आणि २०२० चा स्क्रिपर्स विजेता भारतीय नवनीत मुरलीकडून प्रशिक्षण घेतले होते. वाॅल्टर्सच्या मदतीने ही स्पर्धा जिंकणारी ती पाचवी विद्यार्थिनी आहे. वाॅल्टर्स स्पेलिंग कम्युनिटीशी ११ वर्षांपासून जोडली आहे. हरिणीने सातव्या वर्षापासून स्पेलिंग बी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
सातव्या वयापासून तयारी, स्पेलिंग बी लिजेंड व भारतीयाकडून प्रशिक्षण
अमेरिकेतील प्रतिष्ठित स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा भारतीय वंशाची विद्यार्थिनी हरिणी लोगानने जिंकली आहे. १४ वर्षीय हरिणी टेक्सास राज्याच्या सॅन अँटोनियाची रहिवासी असून इयत्ता आठवीत शिकत आहे. तिने डेनव्हरचा रहिवासी सातवीत शिकणारा १२ वर्षांचा भारतीय वंशाचा विद्यार्थी विक्रम राजूला हरवले. हरिणी ९० सेकंदांत २१ शब्दांचे योग्य अर्थ सांगू शकली. विक्रम १५ शब्दांचा योग्य अर्थ सांगू शकला. याच पद्धतीने हरिणीने विक्रमला ६ गुणांनी हरवले. ट्रॉफीसोबत हरिणीला ५० हजार डॉलरहून(सुमारे ३८ लाख रु.) अधिक रोख रक्कम मिळाली. स्पेलिंग बी स्पर्धेत गेल्या २ दशकांपासून भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचा दबदबा कायम आहे. गेल्या २३ स्पर्धांपैकी २१ चे विजेते भारतीय मूळ वंशाचे विद्यार्थी राहिले आहेत.
१९२५ मध्ये सुरू झालेल्या नॅशनल स्पेलिंग बीच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेता निश्चित करण्यासाठी टायब्रेकरची मदत घ्यावी लागली. २०१९ च्या स्पर्धेत ८ विद्यार्थ्यांनी एवढे चांगली उत्तरे दिली होती की, परीक्षकांना शब्दही अपुरे पडले होते. यानंतर विजेता निवडण्यासाठी या फेरीचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळीही शेवटच्या फेरीत हरिणी आणि विक्रम एवढे झटपट उत्तरे देत होते की, परीक्षकांना व्हिडिओ पाहून सर्वात आधी कुणी उत्तर दिले हे पाहावे लागले. हरिणीने सर्वात शेवटी moorhen शब्दाचा अर्थ(वन्य कोंबडी) सांगून स्पर्धा जिंकली. हरिणीने प्रथम २०१८ मध्ये या स्पर्धेत भाग घेतला. तेव्हा ती ३२३ व्या स्थानी होती. २०१९ मध्ये ती ३० व्या स्थानापर्यंत पोहोचू शकली. २०२० मध्ये कोरोनामुळे स्पर्धा रद्द झाली होती. या वर्षी २३४ स्पर्धकांनी भाग घेतला. त्यापैकी १२ अंतिम फेरीत पोहोचले. तेव्हा हरिणी एका शब्दाच्या अर्थावरून स्पर्धेबाहेर पडली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.