आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीचे दर:मॉडर्नाची कोरोना लसीचा डोस 1850 ते 2750 रुपयांपर्यंत असेल; स्पुटनिकने म्हटले- मॉर्डना आणि फायझरपेक्षा स्वस्त देऊ

नवी दिल्ली/ न्यूयॉर्क/ मॉस्को2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीरमनंतर आता मॉडर्नाच्या सीईओने दिले किमतीबाबत स्पष्टीकरण
  • ऑर्डर किती यावरही किंमत अवलंबून असेल, अमेरिकी कंपनीचे वक्तव्य

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीची किंमतही जाहीर होत आहे. लस विकसित केल्याचा दावा करणाऱ्या मॉडर्ना या अमेरिकी कंपनीचे सीईओ स्टीफन बेन्सेल यांच्या मते, प्रति डोस किंमत २५ ते ३७ डॉलरपर्यंत (सुमारे १८५० ते २७५० रु.) असेल. ऑर्डर किती मिळाली आहे यावरही किंमत अवलंबून असेल. दुसरीकडे, काही माध्यमांच्या वृत्तात फायझरच्या प्रति डोसची किंमत १९.५ डॉलर (सुमारे १४५० रुपये) सांगितली जात आहे. त्याआधी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनीही लसीची संभाव्य किंमत सांगितली आहे. रशियाने म्हटले की, स्पुटनिक-५ या लसीचा डोस मॉडर्ना व फायझर या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असेल. अॅस्ट्राझेनेकात बायोफार्मास्युटिकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे कार्यकारी अध्यक्ष सर मेने पंगलोस म्हणाले की, चाचणी यशस्वी झाल्यानंतर ती ज्यांची प्रतिकारक शक्ती प्रभावीपणे काम करत नाही आणि ज्यांना लस देता येऊ शकत नाही अशा लोकांच्या उपचारात उपयुक्त ठरेल.

लसीच्या आपत्कालीन वापरासाठी तयारी

देशात तयार होत असलेल्या ज्या लसीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण होत आहे तिच्या आपत्कालीन वापराची मंजुरी आणि साधनांबाबतच्या शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे. त्यांची परवाना प्रक्रिया प्रलंबित आहे. अलीकडेच लसींच्या किंमत निर्धारणासह अग्रीम खरेदीच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. तीत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन आणि आरोग्य सचिव राजेश भूषण हजर होते. त्यात असे ठरवण्यात आले की, पीएमओ लस कृती दल स्थापन करेल, ते किंमत आणि लसीबाबत निर्णय घेईल. सध्या देशात सीरम, बायोटेक आणि आयसीएमआर कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी करत आहे.

६० वर्षांवरील ज्येष्ठांवर चाचणी करण्याची इच्छा

६० वर्षांवरील ज्येष्ठांवर विशेषत्वाने या लसीची चाचणी करण्याची कंपनीची इच्छा आहे. कारण अशा लोकांत गंभीर आजार विकसित होण्याची जोखीम जास्त असते.

अॅस्ट्राझेनेका करणार अँटिबॉडीद्वारे उपचार करण्याची चाचणी

कोरोना विषाणूच्या इलाजासाठी अॅस्ट्रॉझेनेका अँटिबॉडीशी संबंधित चाचणी ब्रिटनमध्ये सुरू करेल. नवे ‘अँटिबॉडी कॉकटेल’ कोरोनाला एक वर्षापर्यंत विकसित होण्यास रोखू शकेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser