आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भव्‍य प्रदर्शन:दुबई एक्स्पोला आतापर्यंत 2 कोटी लोकांची भेट, सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजनाचा या प्रदर्शनात समावेश

दुबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबईत सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या एक्स्पोच्या नावे आणखी एक कामगिरी नोंदवली गेली. तेथे आतापर्यंत २ कोटींहून जास्त लोकांनी भेटी दिल्या. सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजनाचा या प्रदर्शनात समावेश आहे. भारतासह १९२ देश आपली कला, संशोधनांचे प्रदर्शन येथे करत आहेत. भेट देणाऱ्यांच्या विक्रमी संख्येच्या निमित्ताने एक्स्पो २०२० दुबई हायर कमिटीचे अध्यक्ष एचएच शेख अहमद बिन सईद अल मख्तूम म्हणाले, आम्ही २०१३ मध्ये आयोजनाला सुरुवात केली होती. तत्पूर्वी आम्ही एक्स्पो २०२० दुबईचे उद्दिष्ट निश्चित केले होते. आता एक्स्पो उद्दिष्टापासून ५० लाखाने दूर आहे. आम्हाला २.५ कोटी प्रेक्षकांचे आतिथ्य करायचे आहे.

२८ मार्चला भारत साजरा करणार राष्ट्रीय दिन
दुबई एक्स्पोमध्ये दक्षिण आफ्रिका व भारत २८ मार्च रोजी राष्ट्रीय दिन साजरा करणार आहे. मनोरंजन तसेच गुणवत्तापूर्ण कार्यक्रमांचे आणखी दोन आठवडे आयोजन केले जाणार आहे. एक्स्पो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. हा मेळा १८२ दिवसांचा आहे.

32,000 प्रदर्शनांचे आतापर्यंत आयोजन
2.5 कोटी लोकांच्या भेटीचे उद्दिष्ट

बातम्या आणखी आहेत...