आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Economist's Report Claims 70 Lakh To 13 Million More Deaths Due To Corona In The World, Governments Hid The Figures; News And Live Updates

द इकॉनॉमिस्टच्या अहवालात दावा:कोरोनामुळे जगभरात 70 लाख ते 1.3 कोटी मृत्यू; सरकारांनी आकडेवारी लपवली

वॉशिंग्‍टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या देशात डाटा मिळाला नाही, तेथे मशीन-लर्निंग मॉडेलव्दारे अंदाज

कोरोना महामारीच्या पहिल्या आण‍ि दुसर्‍या लाटेमुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी लोक कोरोनाच्या विळाख्यात सापडले आहे. द इकॉनॉमिस्टच्या अहवालानुसार, जगभरात कोरोनामुळे 70 लाख 1.3 कोटी मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. टेस्टिंग आण‍ि रिपोर्टिंगच्या कमतरतेमुळे मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीत मोठी तफावत असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. कोरोनाची खरी आकडेवारी सरकारने लपवली असून यामध्ये आफ्रिका, आशियाच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन आण‍ि फ्रान्स देशांचादेखील समावेश आहे. कोरोनाच्या खबरदारीमुळे फ्लू आण‍ि अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचे अहवालात समोर आले आहे.

मृत्यूची खरी आकडेवारी शोधण्यासाठी इकॉनॉमिस्टने एक मॉडेल तयार केला आहे. ज्यामध्ये जगभरात 71 लाख 1.27 कोटी लोक मरण पावल्याची 95 टक्के शक्यता वर्तवली आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू अन्य कारणांमुळे दाखवले गेले असून हे प्रकरणे कमी आण‍ि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये घडले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ओईसीडीमध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक श्रीमंत देशांमध्ये मृत्यूची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा 1.17 पट जास्त असू शकते. तर सब-सहारान आफ्रिकेत हे अधिकृत आकडेवारीपेक्षा 14 पट जास्त असल्याचे अंदाज आहे. जगभरात अधिक मृत्यूचा अंदाज घेण्यासाठी विस्तृत डेटा गोळा केला गेला आहे.

200 पेक्षा जास्त देशांतून गोळा केला डाटा
सामान्यत: बरेच लोक पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंनटाईन करण्यात आले. परंतु, संपर्कात आलेल्या अनेक लोकांची चाचणी झाली नाही. फक्त जे लोक स्वत:हून चाचणीसाठी आले त्यांचेच टेस्टिंग झाले. मृत्यूचा हा डाटा 200 पेक्षा जास्त देशातून घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, मशीन-लर्निंग मॉडेल विकसित केले गेले ज्याने ग्रेडियंट बूस्टिंग या प्रक्रियेचा वापर करून या निर्देशांक आणि अधिक मृत्यू यांच्यातील संबंध शोधण्यात आले.

कोठे? किती मृत्यू होण्याचा अंदाज

क्षेत्रअधिकृत मृत्यूअंदाज
आशिया6 लाख24 ते 71 लाख
लॅटीन अमेरिका/कॅरिब‍ियन6 लाख15 ते 18 लाख
आफ्रिका1 लाख21 लाख
युरोप10 लाख15 ते 16 लाख
अमेरिका/कॅनडा6 लाख6 ते 7 लाख
ओशिनिया ​​​​​​​1,21812 हजार ते 13 हजार

ज्या देशात डाटा मिळाला नाही, तेथे मशीन-लर्निंग मॉडेलव्दारे अंदाज
जगात ज्या ठिकाणी कोरोनामुळे होणारे मृत्यूंचा डाटा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी मशीन-लर्निंग मॉडेलव्दारे अंदाज लावण्यात आला आहे. भारतात अधिकृतपणे 4 हजार लोकांची मृत्यूंची नोंद करण्यात येते होती. परंतु, वास्तविक एका 6 हजार ते 31 हजारापर्यंत मृत्यू होत होते असा दावा अहवालात करण्यात आला आहे. परंतु, भारत सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काही प्रमुख निष्कर्ष

  • एकच आरोग्य सुविधा असलेल्या दोन ठिकाणी वृद्ध लोकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू
  • श्रीमंत देशांपेक्षा समान वयाच्या गरीब देशांमधील तरुणांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
  • यापूर्वी कोरोनाबाधीत देशांमध्ये क्रॉस इम्युनिटीमुळे मृत्यूची संख्या कमी
  • अंदाज डेटाचा पर्याय असू शकत नाही, परंतु भविष्यातील उपाययोजना करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो असे एरियल कार्लिन्स्की सांगतात.
बातम्या आणखी आहेत...