आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:उदारमतवाद्यांपेक्षा पुराणमतवाद्यांवर फेक न्यूजचा परिणाम जास्त; गेट्स यांनी चिप बसवल्याचे, ट्रम्प-झुकेरबर्ग यांचे दावेही खरे मानले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेक न्यूजमुळे इराणमध्ये मिथेनॉल प्यायल्याने ७०० जणांचा मृत्यू झाला; अनेक दावे खोटे ठरले
  • गटारीत बसून, गूळ खाऊन प्लेग बरा झाल्याची अफवा पसरली होती

 जागतिक आरोग्य संघटनेने फेब्रुवारीमध्ये कोविड-१९ विषयी घोषित केेलेल्या इन्फोडेमिकआधीही जगभरात फेक न्यूजचा किंवा खोट्या बातम्यांचा प्रसार सुरूच होता. यापूर्वीही असे घडले होते. १४ व्या शतकात प्लेग आणि त्यावरील उपचारासंबंधी खोट्या माहितीमुळे अनेक जणांचे मृत्यू झाले होते. अनेक डॉक्टरांनी दावा केला होता की, गटारीत बसून राहिल्याने किंवा अंघोळ केल्याने, जुना गूळ खाल्ल्याने आणि आर्सेनिकच्या सेवनाने प्लेग बरा होतो हे खरे मानल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. तीदेखील फेक न्यूजच होती.

१४ व्या शतकातील आणि सर्वात मोठा फरक म्हणजे इंटरनेट आहे. यामुळे जगभरात खोट्या माहितीचा प्रसार वेगाने होत आहे. आश्चर्यजनक बाब म्हणजे, फेक न्यूजचा परिणाम उदारमतवाद्यांपेक्षा पुराणमतवाद्यांवर जास्त झाला आहे. याचे उदाहरण इराणमध्ये बघायला मिळाले आहे. अल्कोहोल प्यायल्याने कोरोना बरा होत असल्याच्या अफवेमुळे मिथेनॉल प्यायल्याने ७०० जणांचा मृत्यू झाला. तसेच मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स लस देण्याच्या बहाण्याने लोकांमध्ये चिप बसवणार असल्याचे अमेरिकेत अनेकांनी आणि ४४ % रिपब्लिकनने मान्य केले होते. ब्रिटनमध्येही ५ जीमुळे संसर्गाची अफवा पसरल्याने ९० हून जास्त टॉवर बंद केले होते. चार बेटांवरील २८ देशांमधील गॅलप इंटरनॅशनलच्या संशोधनानुसार, कोरोना जाणूनबाजून पसरवल्याचे जगातील ५८ % लोकांनी मान्य केले होते. प्लेडेमिक नावाच्या फिल्म क्लिपमध्ये लोक मरत असल्याचेही लोकांनी मान्य केले होते. हे ८० लाख लोकांनी पाहिले.

ट्रम्प, झुकेरबर्ग यांचे दावे खोटे ठरले : मार्क झुकेरबर्ग यांनी ब्लीचमुळे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कीटकनाशकच्या इंजेक्शनने कोरोना बरा होत असल्याचा दावा केला होता. दोघांचेही दावे खोटे ठरले.

फेक न्यूजचे उदाहरण १४ व्या शतकात प्लेगच्या वेळी बघायला मिळाले होते. त्या वेळीही या महामारीविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. यात गटारीत बसून अंघोळ करणे, जुना गूळ खाणे आणि आर्सेनिकच्या सेवनाने प्लेग बरा होत असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र ते खोटे ठरले होते.

बातम्या आणखी आहेत...