आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Effect Of The Antibiotic Given To The Cow Is Also Seen In The Milk, So The Effect Of The Medicine Decreases!

दिव्य मराठी विशेष:गायीला दिल्या जाणाऱ्या अँटिबायाेटिकचा परिणाम दुधातही दिसू लागल्याने औषधींचा प्रभाव घटताेय!

न्यूयाॅर्क14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात डेअरी उत्पादनांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यातही गायींची मागणी सर्वाधिक आहे. मागणीची पूर्तता करण्यासाठी गायींना वारंवार अँटिबायाेटिक इंजेक्शन दिले जात आहे. परिणाम हे अँटिबायाेटिक गायीच्या दुधातही पाझरू लागले आहे. सामान्यपणे असे घडत नाही. परंतु डाेस जास्त प्रमाणात असल्याने हे घडून येत आहे. अशा दुधाचा वापर लाेक करतात. तेव्हा हळूहळू त्यांच्या शरीरात अँटिबायाेटिक काही प्रमाणात साठवले जाते. त्याचा फटका राेगप्रतिकारक शक्तीवर हाेताे.

त्यामुळे आजारपणाच्या काळात दिल्या जाणाऱ्या अँटिबायाेटिकचा परिणाम त्यांच्या शरीरावर हाेत नाही. कार्नेल विद्यापीठाच्या अध्ययनात ही बाब दिसून आली आहे. अनेक लाेक आजारपणाच्या काळात गायीच्या दुधाचा वापर करतात. त्यामुळे आजारपणाच्या उपचारावेळी दिल्या जाणाऱ्या अँटिबायाेटिकचा परिणाम कमी हाेताे. डाॅ. रेनाटा इव्हानेक म्हणाले, जगभरातील अँटिबायाेटिक्सचा जास्त वापर डेअरी क्षेत्रात उत्पादन वाढावे म्हणून केला जाताे. परंतु जागतिक पातळीवर डेअरी उद्याेगातील याचा वापर कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी अमेरिकींचे अध्ययन करण्यात आले. अँटिबायाेटिक दुधाच्या डब्यावर आरएयू-लेबल लावण्यात आले. लाेकांमध्ये लेबलयुक्त दूध खरेदी करण्याची इच्छा लेबलविरहित दुधाइतकीच असल्याचे दिसून आले. परंतु लेबल असलेल्या दुधाच्या खरेदीला जास्त प्राधान्य देण्यात आले हाेते.

आतड्यातील जीवाणूंच्या वाढीत अडथळा जास्त प्रमाणात अँटिबायाेटिकचा वापर झाल्यास गायींच्या आतड्यात आढळणाऱ्या जीवाणूंची वाढ घटते. तसे झाल्यास त्याचा परिणाम दुधाच्या गुणवत्तेवरही हाेऊ शकताे. जीवाणूंचे प्रमाण घटणे धोकादायक ठरते.

बातम्या आणखी आहेत...