आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया युक्रेन युद्धाच्या वातावरणामध्ये आता अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्या कुटुंबावर टाच आणायला सुरुवात केलीय अमेरिकेने पुतीन यांच्या दोन्ही मुलींवर बॅन लावण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुतीन यांच्या वैयक्तिक संपत्तीवर परिणाम होईल. त्यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरनस्लोव्हा सध्या रशियाच्या प्रेसिडेंट हाऊसमध्ये काम करतात. तसेच रशियाच्या जेनेटिक रिसर्च प्रोग्रामचे नेतृत्वही करतात. तर पुतीन यांनी लहान मुलगी कॅटरिना दिखोनोव्हा आहे. कॅटरिना रशियाच्या संरक्षण विभागाशी संलग्न आहे. 2018 मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराची धुराही कॅटरिनाच्या खांद्यावर होती. रशिया-युक्रेन युद्धाच्या 43 व्या दिवशी अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलींवर अमिरेकेने बॅन घातले आहे. या निर्णयामुळे पुतिन यांच्या वैयक्तिक संपत्तीवर परिणाम होणार असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. पुतिन यांना दोन मुली असुन त्या रशियाच्या राष्ट्रपती भवनाशी कार्यरत आहे. मरिया आणि कॅटरिना अशी त्यांची नावे आहेत. या दोन्ही सार्वजनिक जीवनात कधीच दिसल्या नाही.
क्रेमलिनमध्ये पुतिनच्या मोठ्या मुलीचा दबदबा
व्लादिमीर पुतिन यांची मोठी मुलगी डॉ. मारिया वोरोंत्सोवा सध्या क्रेमलिन, रशियन राष्ट्रपती भवनात काम करते. तथापि, ते अधिकृतपणे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च सेंटर फॉर एंडोक्रिनोलॉजी विभागातील प्रमुख संशोधक आहेत. 36 वर्षीय मारियाचा गेल्या महिन्यातच घटस्फोट झाला. पण रशियन कोरोनाची लस घेतल्याने ही ती चर्चेत आली आहे. मारियाने मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून वैद्यकीयशास्त्राचा अभ्यास केला आहे. ती रशियाच्या अनुवांशिक संशोधन कार्यक्रमाचे नेतृत्व करते ज्यावर रशियन सरकार अब्जावधी डॉलर्स खर्च करते आहे.
पुतीन यांच्या लहान मुलीच्या नावावर आहे अब्जाधीश संपत्ती
पुतीन यांची लहान मुलगी कॅटेरिना तिखोनोव्हाही क्रेमलिनमध्ये काम करते. ती संरक्षण खात्यातील टेक सपोर्टशी संबंधितम असलेले काम बघते. 29 वर्षीय कॅटरिनाने 2015 मध्ये रशियाच्या क्रिल शमालोवीशी लग्न केले. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार, कॅटरिनाची भारतीय चलनात 15,000 कोटींहून अधिक संपत्ती आहे. कॅटरिना सुरुवातीला पुतिन यांची निवडणूक भाषणेही लिहायची. त्यानंतर 2018 मध्से कॅटरिनाने पुतिन यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारीही घेतली.
पुतिन यांच्या मुली या पहिल्या पत्नीच्या मुली आहेत
व्लादिमीर पुतिन यांनी 1983 मध्ये ल्युडमिलाशी लग्न केले. मारिया आणि कॅटरिना दोघेही पुतिन आणि ल्युडमिला यांची मुले आहेत. पुतिन आणि ल्युडमिला यांचा 2013 मध्ये घटस्फोट झाला. मात्र, त्यानंतर पुतिन यांनी अद्याप लग्न केलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.