आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Elimination Of Al Zawahiri, Like Laden; Targeted By The CIA For Staying On The Balcony For Hours | Marathi News

अभियान:लादेनसारखाच अल- जवाहिरीचा खात्मा; तासन‌्तास बाल्कनीत राहत असल्याने सीआयएच्या निशाण्यावर

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीचा मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ल्यात खात्मा करण्यात आला. ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर तो संघटना चालवू लागला. आपल्या गुप्त घराच्या बाल्कनीत फिरत असताना त्याच्यावर यशस्वी हल्ला करण्यात आला. बाल्कनीत बसून तासन‌्तास वाचन करण्याच्या सवयीने सीआयएला त्याच्यावर हल्ल्याची संधी मिळाली. १९९८ मध्ये टांझानिया व केनियातील अमेरिकन राजदूत कार्यालयांवर हल्ला करण्यामागे जवाहिरीचा हात होता. सीआयए दीर्घकाळापासून त्याच्या मागावर होती. २००१ मध्ये अफगाणिस्तानवर अमेरिकन हल्ल्यानंतर तो पाक सीमेवरील एखाद्या सुरक्षित ठिकाणी दडून बसल्याचा अंदाज होता.

परंतु अफगाणिस्तानवर तालिबानचे दुसऱ्यांदा वर्चस्व आल्यानंतर तो माघारी परतला. अल-कायदाचा हक्कानी नेटवर्कशी संबंध राहिलेला आहे. त्याला ट्रॅक करून सीआयए अल-जवाहिरीपर्यंत पोहोचली. लादेनच्या तपासादरम्यान लिहिलेल्या प्लेबुकचा वापर करून सीआयएने जवाहिरीला गाठले. अफगाणमध्ये एका अमेरिकन लष्करी तळाने लादेनचा शोध घेण्यासाठी मदत केली होती. त्याआधारे जवाहिरीचही माग काढण्यात यश मिळाले आहे. सीआयएने संपूर्ण योजना आखली. २५ जुलै रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचा हिरवा कंदील मिळताच ड्रोनने रेकी करण्यात आली. त्यानंतर एका व्यक्तीला मारण्यासाठी दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

डबल एजंट डॉक्टरच्या आत्मघाती हल्ल्यात सात ठार
अल-जवाहिरीला पकडण्यासाठी सीआयएने एक डॉक्टर हुमाम खलील अबू मुलाल अल बवई यास एजंट बनवले. परंतु तो डबल एजंट निघाला. त्याने चुकीची माहिती दिली. त्यामुळे ३० डिसेंबर २००९ रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआयएच्या सात एजंटांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...