आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोक चांगले करिअर करून आनंदी राहण्यासाठी व्यग्र होतात. कोणताही व्यवसाय सुरू करताना खूप जोखीम घ्यावी लागते, असे सांगितले जाते. कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून कार्यालयीन व्यवस्थापनापर्यंतचे विषय असतात. या सर्व गोष्टी सांभाळताना कुटुंबाकडे नीटपणे लक्ष देता येत नाही. एवढ्या अडचणी असतानाही उद्योजक आपल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त निरोगी व आनंदी असतो.
अमेरिकेच्या रोग नियंत्रण व लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार बायरल व लुसियाना स्टेट विद्यापीठाने यावर संशोधन केले. संशोधन प्रकल्पातील डॉ. व्हार्टन म्हणाले, लहान स्टार्टअप सुरू करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या स्टार्टअपमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून आला. कारण लोकांना काम मिळाले आहे. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावरदेखील झाला. उद्योजक इतरांच्या तुलनेत कमी आजारी पडतात. ते खूप समाधानीदेखील असतात. व्हार्टन यांनी सुमारे ११ हजार पदवीधरांची पाहणी केली. जास्त उत्पन्न असलेले कर्मचारी जीवनावर खूश दिसून आले. स्वत:चा उद्योग स्वत: चालवणारेदेखील खुश होते. त्यांची कमाई किती आहे, याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. कंपनीनुसार आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा. कामाला मोहिमेसारखे पूर्ण करा. अशा प्रकारे तुम्हाला दिवसभर आनंदी राहता येईल.
आनंदी राहण्यासाठी उद्योजकासारखा विचार करा
एखाद्या कर्मचाऱ्याला आनंद मिळवायचा झाल्यास त्याने उद्योजकाप्रमाणे विचार केला पाहिजे, असा सल्ला संशोधकांनी या पाहणीतून दिला आहे. व्यक्तीने स्वत:ला उद्योजक समजून लक्ष्य गाठण्यासाठी स्वत: निर्णय घ्यावा. जोखमीपेक्षा स्वत: व्यवस्थापनावरील विश्वास दाखवावा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.