आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्र बेल्जियमच्या वॉटर्लूचे आहे. येथे १८१५ मध्ये झालेल्या वॉटर्लू युद्धाला पुन्हा सजीव करण्यात आले होते. त्याची पुनरावृत्ती करताना २ हजार लोक, १०० घोडदळ, २० कॅननची मदत घेण्यात आली. त्यात २०७ वर्षांपूर्वीच्या पहिल्या युद्धातील बंदुका, तोफांचाही वापर करण्यात आला. वाटर्लूचे युद्ध बेल्जियमध्ये लढले. फ्रान्सचे सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांचे ते अखेरचे युद्ध होते. एका बाजूने फ्रान्स, दुसऱ्या बाजूने ब्रिटन, रशिया, पर्शिया, ऑस्ट्रिया, हंगेरीचे सैन्य होते. युद्धात पराभूत झाल्यानंतर नेपोलियनने आत्मसमर्पण केले होते. मित्र राष्ट्रांनी त्यास कैद्याच्या रूपात सेंट हॅलेना टापूवर पाठवले. तेथे त्याचा ५२ व्या वर्षी मृत्यू झाला.
नेपोलियनच्या पराभवात ज्वालामुखीचीही भूमिका
बोनापार्टच्या पराभवाला ज्वालामुखीदेखील जबाबदार ठरला होता. कारण लढाईच्या दोन महिने आधी इंडोनेशियाच्या माउंट तंबोरा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यात १० हजार लोकांचे प्राण गेले होते. युरोपात पाऊस झाला होता. पाऊस, चिखलामुळे नेपोलियनच्या सैनिकांना लढाईत अडचणी येत होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.