आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Extraordinary Trend Of Equality In Singapore; Women Run The Office, Husbands Leave The Job And Take Care Of The Children

सिंगापूरवासीयांचा समानतेकडे कल:महिला कार्यालय सांभाळतात, पतींचे मुलांच्या देखभालीकडे लक्ष, दशकापूर्वीच्या तुलनेत संख्या दुप्पट

औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. टॅम वाई जिया (३५) यांनी नुकतेच वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर करिअर सुरू केले आणि त्यांचे पती क्लिफ टॅम नोकरी सोडून त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी घरी थांबले. सिंगापूरमध्ये असे करणारा क्लिफ हा एकमेव पती नाही. तेथील मनुष्यबळ मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी सुमारे १४,१०० पुरुषांनी नाेकरी साेडली. त्यांनी त्याचे कारण ‘घरगुती जबाबदाऱ्या’ असे सांगितले. टॉम म्हणतो की, ताे नाेकरी करत राहिला तर त्याच्या वेतनातील माेठा हिस्सा मुलांच्या संगोपनावर खर्च होईल. त्याऐवजी ताे त्याच्या ५ आणि ३ वर्षांच्या मुलींची घरी काळजी घेत त्यांना पूर्ण वेळ देत आहे.

दशकभरापूर्वीच्या (२०११) तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. ताेपर्यंत ६,७०० पुरुषांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नोकरी सोडली होती. मात्र, महिलांमध्ये हा कल उलट आहे. एका दशकात कौटुंबिक कारणांमुळे नोकरी सोडणाऱ्या महिलांच्या संख्येत २७ % घट झाली. २०११ मध्ये ३,२८,४०० स्त्रियांनी नाेकरी साेडली. २०२१ मध्ये २,३९,१०० असा निर्णय घेतला. समाजशास्त्रज्ञ मानतात की, ही आकडेवारी लैंगिक समानतेची निर्देशक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या ठरवताना नेहमी पत्नीच घर सांभाळेल असे नाही. सेंटर फॉर फादरिंगचे सीइओ ब्रायन टॅन म्हणतात की, जे पुरुष घरीच राहण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यांच्या पत्नीची जास्त चांलगी आहे. त्यांच्या मते समाज लैंगिक समानतेवर भर आणि महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामुळेच पुरुष घराकडे लक्ष देण्यासाठी नाेकरी सोडण्यास तत्परतेने तयार होतात. काेराेना काळात कॉर्पोरेट नाेकरकपातीमुळे पुरुषांना घरी राहण्यास भाग पाडले आहे. त्यापैकी काही घरी राहून अर्धवेळ कमावत आहेत आणि काहींनी नोकरी मिळण्याची आशा साेडली आहे. या परिस्थितीचा ऐतिहासिकदृष्ट्या विचार केल्यास महिला आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी जास्त सक्षम आहेत. त्यांनी यापूर्वी मंदीसारख्या परिस्थितीचाही पुरुषांच्या तुलनेत जास्त चांगल्या पद्धतीने सामना केला आहे.

सिंगापूरमध्ये १३.१% महिला सीईओ, जगात सर्वाधिक
सिंगापूरमध्ये, २५ ते ३२ वयोगटात, पुरुषांपेक्षा जास्त महिला महाविद्यालयीन आणि एमबीए पदवी घेत आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये १३.१% महिला सीइओ आहेत, ही संख्या जगात सर्वाधिक आहे. २०२१ मध्ये, सर्व सीइआे आणि व्यवस्थापकीय संचालकांपैकी २६% महिला होत्या. २०१९ मध्ये ही संख्या फक्त १५% होती. १९८३ मध्ये, उच्च पगाराच्या कार्यकारी, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय व्यवसायांमध्ये महिलांचा वाटा फक्त २२% होता आणि २००१ मध्ये या श्रेणींमध्ये कार्यरत महिलांचा वाटा निम्मा झाला.

बातम्या आणखी आहेत...