आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Fatty Acids In The Skin, The Microbiota, Attract Mosquitoes And Make Some People More Prone To Mosquito Bites

संशोधन:त्वचेतील फॅटी अॅसिड, मायक्राेबायाेटामुळे डास आकर्षित होऊन काहींना डास जास्त चावतात

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इतर लाेकांच्या तुलनेत आपल्याला जास्त डास चावतात, अशी तक्रार काही जण नेहमी करतात. अनेक संशाेधनात डासांपासून कितीही बचाव केला तरी ते माणसाच्या श्वासांची गती, शरीर ऊर्जा, गंध यांना आेळखतात. म्हणून ते सहजपणे मानवी शरीरापर्यंत पाेहाेचतात. त्याशिवाय विविध दावेही हाेते. रक्तगट, मधुमेह किंवा विशिष्ट पदार्थांच्या सेवनामुळेदेखील डासे जास्त चावतात. परंतु आजवर त्यावर ठाेस संशाेधन झालेले नव्हते किंवा तसा डेटाही नव्हता. ठाेस तथ्यांच्या मांडणीसाठी वाेशाल व मारिया एलेना डी आेबाल्डिया यांनी एक अध्ययन केले. त्याचे निष्कर्ष सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यानुसार मानवी त्वचेवर विविध प्रकारचे मायक्राेबायाेटा असतात. त्यामुळे डास त्यांच्याकडे आकर्षित हाेतात. त्याचबराेबर त्वचेवरील फॅटी असिड्सदेखील डासांसाठी विशिष्ट प्रकारचा गंध तयार करते. त्यामुळे डास दुरूनही आकर्षित हाेतात. म्हणूनच जास्त फॅटी असिड्स असल्यानेदेखील डास जास्त चावतात असे म्हणता येईल. हा अध्ययन प्रकल्प तीन वर्षे चालला. त्यात आठ जणांवर प्रयाेग झाला. सहा तास हातात नायलाॅनची स्लीव्ह घालून हे अध्ययन झाले. त्यात काही घटक तयार करण्यात आले हाेते. त्याला सब्जेक्ट -३३ व सब्जेक्ट -१९ अशी नावे देण्यात आली हाेती. जास्त डास सब्जेक्ट-३३ कडे आकर्षित झाले हाेते. सर्वात कमी डास सब्जेक्ट-१९ कडे गेले हाेते. त्वचेतून स्रवणाऱ्या सिबम या द्रव्याच्या गंधामुळे हे घडून आले.

डास चुंबकासारखे, त्वचेला चिकटतात आेबाल्डिया म्हणाले, या अभ्यासात काही डास चुंबकासारखे वर्तन करताना दिसून आले. प्रयाेगातील सब्जेक्टचे वर्तन बदलते. परंतु शरीरातून निघणाऱ्या रासायनिक द्रवाचे गुणधर्म स्थिर दिसले.

बातम्या आणखी आहेत...