आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना व्हायरस:युरोपमध्ये आढळला होता पहिला रुग्ण, डॉक्टरांना कळले नाही : संशोधनात दावा

पॅरिस2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • दोन एक्स-रे रिपोर्टवरून कोरोनाची खात्री करण्यात आली.

युरोपमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण १६ नोव्हेंबर २०१९ मध्ये आढळल्याचा दावा फ्रान्समधील शास्त्रज्ञांच्या पथकाने केला आहे. उत्तर-पूर्व फ्रान्समध्ये एका रुग्णालयाने नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान रुग्णालयात फ्लूची तक्रार घेऊन आलेल्या २५०० हून अधिक लोकांचा एक्स-रे रिपोर्टवर संशोधन केले आहे. नोव्हेंबरमधील दोन एक्स-रे रिपोर्टवरून कोरोनाची खात्री करण्यात आली. मात्र त्या वेळी डॉक्टरांना याची माहिती नव्हती. ईशान्य फ्रान्समध्ये कॉलमार येथील अल्बर्ट श्वित्जर रुग्णालयात डॉ. मायकल श्मिट यांच्या पथकाच्या दाव्यानुुसार, कदाचित चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला नसावा. नोव्हेंंबरच्या मध्यातच युरोपमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. रुग्णालयात १६ नोव्हेंबरला एकाचा एक्स-रे काढण्यात आला. रिपोर्टवरून त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट होते. 

0