आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) मंगळ मिशन होप प्रोब मंगळवारी ७ महिन्यांनंतर ४९.४ कोटी किमींचा प्रवास करून मंगळाच्या कक्षेत दाखल झाले. मोहीम फत्ते होताच नवा विक्रम यूएईच्या नावावर नोंदवण्यात आला. यूएईने पहिल्याच प्रयत्नात अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत पोहोचवण्यात यश मिळवले. मंगळ मोहीम यशस्वी करून दाखवणारा यूएई हा जगातील पहिलाच मुस्लिम देश ठरला.
त्याशिवाय मंगळ कक्षेत पोहोचणारा यूएई हा जगातील पाचवा देश ठरला आहे. अमेरिका, सोव्हिएत संघ, युरोप व भारताला या कक्षेत प्रवेश करण्यात यश मिळालेले आहे. यूएईच्या अंतराळ संस्थेच्या म्हणण्यानुसार होप यानाने १.२० लाख किमींचा प्रवास पूर्ण केला.
उद्दिष्ट : मंगळाचा पहिला ग्लोबल वेदर मॅप तयार करणे.
मंगळाचा पहिला ग्लोबल वेदर मॅप तयार करणे असे उद्दिष्ट आहे. त्याद्वारे मंगळावरील वातावरणाचे अध्ययन केले जाणार आहे. मंगळाच्या प्रत्येक भागाची निगराणी केली जाणार आहे.
धोका : दूर जाणे, नष्ट होण्याची शक्यता
यूएईच्या संशोधकांनी होपचा वेग वाढवल्यास तो मंगळापासून दूर जाण्याची शक्यता आहे. होप मंद गतीने गेल्या तो मंगळावर नष्ट होऊ शकतो.
स्पर्धा : आज चीन, १८ रोजी अमेरिकेचे यान पोहोचेल
यूएईनंतर गुरुवारी चीनचे तियानमेन-१, १८ फेब्रुवारीला अमेरिकेचे अंतराळ यान मंगळावर दाखल होईल. एका महिन्यात तीन अंतराळ यान पोहोचण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
६१ वर्षांत ५८ मोहिमा, सर्वाधिक २९ अमेरिकेच्या नावेमंगळावर गेल्या ६१ वर्षांत ५८ मोहिमा झाल्या. सुरुवातीला सोव्हिएत संघाने १० ऑक्टोबर १९६० रोजी मोहीम केली होती. परंतु अमेरिकेला यश मिळाले. मंगळावर आतापर्यंत सर्वाधिक मोहिमा अमेरिकेेने (२९) केल्या. दुसऱ्या क्रमांकावर सोव्हिएत संघ म्हणजे आताच्या रशियाने २२, ईयूने ४ मोहिमा यशस्वी केल्या. भारत, जपान, चीन व यूएईने प्रत्येकी एक मोहीम केली.
४ वर्षांत ५ मोहिमा, भारताच्या मंगळयान-२ चा समावेश
पुढील चार वर्षांत पाच देश मंगळावर मोहीम करणार आहेत. सर्वात आधी ईयू व रशिया िमळून २०२२ मध्ये एक्सोमार्स नावाचे लँडर-रोव्हर पाठवतील. याच वर्षी जपान एक ऑर्बिटर व लँडर पाठवेल. २०२३ मध्ये अमेरिकेचे सायकी यान मंगळापासून जाईल. भारत २०२४ मध्ये मंगळयान-२ पाठवेल. त्यात एक ऑर्बिटर व बहुतांश एक लँडरही असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.