आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंग्लंडमध्ये साउथवॉल्डच्या जंगलात जगातील पहिले आेपन थिएटर तयार केले जात आहे. त्याचे काम महिनाखेरीस पूर्ण होईल. हे प्रेक्षागृह पूर्णपणे लाकडाने साकारले जात आहे. याची ३५० प्रेक्षकांची क्षमता आहे. दिवसा झाडांची सावली व रात्री खुल्या आकाशाखाली कार्यक्रम आयोजित केले जातील. पर्यावरणप्रेमींचा विचार करून हे साकारले जात आहे. नाट्य कलावंतांना आपली कला सादर करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यासोबतच त्याद्वारे वेळोवेळी झाडांचे महत्वही सांगितले जाईल. हे प्रेक्षागृह साकारणारे चार्लोट बाँड म्हणाले, या थिएटरला ‘ द थोरिंग्टन थिएटर’ असे नाव देण्यात आले आहे. नाट्य, संगीताधारित नाटकेही येथे पाहायला मिळतील. चार्लोट यांच्या म्हणण्यानुसार थिएटर प्रत्यक्षात आणण्यासाठी एकाही झाडाची कत्तल करावी लागली नाही.
महायुद्धात येथे बॉम्ब कोसळले : चार्लोट बाँड म्हणाले, थिएटर बनत असलेल्या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोन बॉम्ब कोसळले होते. येथे त्याची खूण म्हणून मोठा खड्डा दिसतो. खड्ड्यात जास्त झाडे नसल्याने प्रेक्षागृह साकारले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.