आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The First Smartphone Film Festival To Be Shot On A Half film Smartphone; The Organizers Claim That The Film Is Made By Maintaining Quality; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:निम्मे चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित झालेला पहिला स्मार्टफोन फिल्म फेस्टिव्हल; गुणवत्ता टिकवून चित्रपट निर्मितीचा आयोजकांचा दावा

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लंडनमध्ये आयोजित फेस्टिव्हलमध्ये स्पेन, इराण व व्हेनेझुएलातील चित्रपटांचा सहभाग

ब्रिटनच्या राजधानीत सध्या ‘द लंडन इंटरनॅशनल स्मार्टफोन फिल्म फेस्टिव्हल’ (स्मार्ट फॉर शॉर्ट) सुरू आहे. यात ब्रिटनशिवाय स्पेन, इराण आणि व्हेनेझुएलासारख्या देशांतूनही चित्रपट आले आहेत. यात डॉक्युमेंट्री, थ्रिलर आणि आर्ट चित्रपटांचा समावेश आहे. या सर्वच चित्रपटांत एक साम्य म्हणजे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण स्मार्टफोनद्वारे करण्यात आले आहे. हा मोठा चित्रपट महोत्सव आहे. यात सहभागी चित्रपटांचा ५० टक्के भाग मोबाइलवर चित्रित झाला आहे. आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे.

आयोजक अॅडम जी आणि व्हिक्टोरिया मॅपलबेक यांनी सांगितले की, महोत्सवात सहभागी चित्रपटांत वैविध्य तर आहेच शिवाय गुणवत्तेतही ते असामान्य आहेत. मॅपलबेक म्हणाल्या, ‘क्वचितच या चित्रपटांत आम्हाला अनावश्यक भाग आढळून आला. अॅडम म्हणाले की, हा काळ चित्रपटांसाठी कठीण राहिला आहे. महामारी आणि सुरक्षिततेच्या नियमांमुळे पारंपरिक चित्रपट निर्मिती कठीण झाली आहे. निराश झालेल्या काही दिग्दर्शकांनी मोबाइलचा पर्याय निवडला. हीच बाब हेरून आम्ही २०२१ हे शुभारंभी वर्ष निवडले. महामारीमुळे चित्रपटांचे स्क्रीनिंग थांबले आहे. त्यामुळे हा फेस्टिव्हल व्हर्च्युअल ठेवला गेला, जेणेकरून परीक्षकांची समिती यात सहभागी चित्रपट ऑनलान बघू शकतील.

हॉलीवूडच्या दिग्दर्शकांकडून महागड्या उपकरणांवर होत असलेल्या चित्रीकरणाबाबत अॅडम म्हणाले की, मोबाइल आणि महागड्या उपकरणांची तुलना करणे चुकीचे आहे. स्मार्टफोन लोकांना व्यावसायिक चाकोरीत सहभागी न करताही आपले काम लोकांपर्यंत पाेहोचवण्याचा लाभ देते. तसे बघितले मनोरंजक आणि शोधक चित्रपट निर्मिती टिकटॉकवरही होत आहे. मॅपलबेक यांच्या मते स्मार्टफोन आणि त्यांच्या कमी होत असलेल्या किमतीचाच अर्थ असा की, मुख्य प्रवाहातील चित्रपट या तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. चित्रपट लहान असो वा मोठा, बजेट कितीही असो, पण स्मार्टफोनही त्यासाठी पर्याय ठरू शकतो.

स्मार्टफोनवर चित्रित ‘मिस्ड कॉल’ चित्रपटाने बाफ्टा अवॉर्ड जिंकला
मॅपलबेक यांनी स्मार्टफोनवर चित्रित केलेल्या ‘मिस्ड कॉल’ चित्रपटाने २०१९ मध्ये बेस्ट शॉर्ट फिल्मचा बाफ्टा अवॉर्ड जिंकला होता. अॅडम यांच्या मते सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. ते चांगले आणि गुणवत्तापूर्ण व्हिडिओ-छायाचित्र घेण्यात सक्षम आहेत. सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. यू-ट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे जगापर्यंत पोहोचता येते. गरज आहे ती कौशल्य आणि दृष्टीची..

बातम्या आणखी आहेत...